घरमनोरंजनमोरासोबत फोटो काढणं अभिनेत्रीच्या आलं अंगलट, व्हिडिओ व्हायरल

मोरासोबत फोटो काढणं अभिनेत्रीच्या आलं अंगलट, व्हिडिओ व्हायरल

Subscribe

‘जलेबी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिगांनगा सूर्यवंशी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बॉलिवूडमध्ये पदापर्ण केल्यानंतर आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान दिगांगनाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.अनेकदा प्राणी आणि पक्षांसोबत फोटो काढण्यासाठी कलाकार उत्सुक असतात. मात्र असाच मोरोसोबत फोटो काढणे दिगांगना चांगलाच अंगलट आला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिगांगना एका मोरासोबत उभी आहे यावेळी तो मोर तिच्यावर हल्ला करताना दिसतोय.

याचा एक व्हिडिओ सध्या इंस्ट्राग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिगांगनाने निळा रंगाचा सलवार कुर्ता परिधान केला आहे. मोरासोबत फोटो काढण्यासाठी दिगांगना उभी असते. ती मोरासोबत फोटा काढताना घाबरलेली दिसतेय यावेळी काही लोक तिचे फोटो काढत आहे. परंतु काही वेळात मोर दिगांगनावर हल्ला चढवतो. यात दिगांगनाच्या डाव्या हाताला जखम होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

तिच्या या व्हिडिओच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही युझर्स तिला पक्ष्यासोबत चुकीचं वागली म्हणून दोष देत आहेत. तर काही तिची काळजी करत आहेत. दिगांगनाच्या एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका युजर्सने लिहिले की, देवा शपथ, माझ्या आईने मला हे पटवून दिलं आहे की तो मोर तुला मिठी मारायला आला होता. दिगांगनाचा हा अंदाज चाहत्यांना अतिशय आवडला आहे. या व्हिडिओमध्ये मोराच्या हल्ल्य़ानंतर हसताना दिसत आहे. दिगांगनाने बिग बॉस ९ मधील स्पर्धक होती. तर नुकतेचं तिने ‘जलेबी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्द केले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -