Remdesivir Injection: पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनासाठी नातेवाईकांची वणवण, महापालिका रुग्णालयात मोठी गर्दी

पुण्यातील दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री बंद केली गेली त्यामुळे आता पुण्याच्या महापालिका रुग्णालयात नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी गर्दी केलेली पहायला मिळत आहे.

remdesivir injection use not for all covid patients say medical experts
प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरची गरज नाही, तज्ज्ञांचे मत

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची बाजारात मागणी वाढली आहे. मात्र रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. मुंबईप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे मात्र इंजेक्शन मिळत नाहीय. प्रशासनाने काढलेल्या नव्या नियमांनुसार, जो रुग्ण ज्या रुग्णालयात आहे तेच रुग्णालय रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा करेल, नातेवाईकांना इंजेक्शनसाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. मात्र आता डॉक्टर स्वत: नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरुन आणण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री बंद केली गेली त्यामुळे आता पुण्याच्या महापालिका रुग्णालयात नातेवाईकांनी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी गर्दी केलेली पहायला मिळत आहे. महापालिका रुग्णालयाच्या बाहेर रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

सरकारने लॉकडाऊन लावण्याऐवजी रेमडेसिवीर इंजेक्शनाची सोय करावी, अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. गेली २ -३ दिवस नातेवाईक इंजेक्शनासाठी फिरत आहेत. मात्र त्यांना अद्याप इंजेक्शन मिळालेले नाही. सरकार फक्त व्हिआयपी लोकांना इंजेक्शन देत आहे. सामान्य लोकांना नाही. गेली अनेक दिवस रुग्ण आयसीयू बेडवर आहे. त्यांना तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनाची गरज आहे. मात्र गरिबांना सरकार इंजेक्शन मिळवू देत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईंकांमध्ये तीव्र संताप पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सरकारने टोल फ्रि नंबर दिला आहे. नातेवाईक गेली २- ३ दिवस नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असेही नातेवाईकांनी सांगितले.

रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासल्यास रुग्णालय त्यांना इंजेक्शन मिळवून देईल असे सांगण्यात आले. मात्र जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा इंजेक्शनची गरज भासत आहे त्यावेळीस डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी इंजेक्शन बाहेरुन आणण्यास सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे दुकानांच्या बाहेर गर्दी न करण्याचे आवाहनही केले जात आहे. या सगळ्या परिस्थितीतून आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार लोकांसमोर येत आहे. लोकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा – गरजेनुसार लिक्विट ऑक्सिजन टँक बसवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना