कुटुंबीयांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बॉडीगार्ड ठेवले…आमीर खानच्या भावाचा खुलासा

मीर खानचा भाऊ फैसल खान देखील चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैसल खानला अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त शो 'बिग बॉस 16' साठी फैसल खानला अप्रोच करण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान वारंवार त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. दरम्यान, सध्या आमीर खानचा भाऊ फैसल खान देखील चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैसल खानला अभिनेता सलमान खानच्या वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ साठी फैसल खानला अप्रोच करण्यात आलं होतं. मात्र, फैसल खानने या शोमध्ये सहभाग घेण्यासाठी नकार देत म्हणाला की मला माझी आजादी खूप आवडते.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीमध्ये फैसल खानने आमीर खानबाबत अनेक खुलासे देखील केले आहेत. त्याने सांगितले की, कुटुंबियांवर नाराज असल्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावलो. परंतु ही गोष्ट त्यांना कधीही समजली नाही. त्यांनी मला मी पागल घोषित केलं. इतकंच नव्हे तर, त्यांनी मला कैद केलं, काही औषधं देऊ लागले आणि माझा फोन सुद्धा काढून घेतला. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बॉडीगार्ड देखील ठेवले होते. माझा जगाबरोबरचा संबंध पूर्ण पणे तोडून टाकला. काही दिवस मी हे सहन केलं. परंतु जेव्हा मला सिगरेट ओढण्यास नकार देण्यात आला. तेव्हा मी विरोध केला.

फैसल खान पुढे म्हणाला की, विरोध केल्यानंकर मी माझं घर सोडलं. मी माझ्या एका मित्राकडे गेलो जो पोलीस होता. तो मला म्हणाला की, तुमच्या घरच्यांनी खाजगी हॉस्पीटलमधून टेस्ट करून तुम्हाला वेडं करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जेव्हा कोर्टामध्ये केस होणार तेव्हा सरकारी हॉस्पीटलच्या तपासणीवरच विश्वास ठेवला जाईल. तेव्हा मी सरकारी हॉस्पीटलमध्ये टेस्ट केली. अनेक वर्षांपर्यंत माझी केस कोर्टामध्ये चालू होती. परंतु शेवटी मी जिंकलो. कोर्टाने देखील मी वेडा नाही हे सांगितलं. या काळात माझ्या वडीलांनी माझी साथ दिली.


हेही वाचा :

अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ ओटीटीवर महिन्यातला सर्वाधिक पाहिलेला चित्रपट!