घरताज्या घडामोडीVideo: चाहत्याने केला सारा अली खानचा किस घेण्याचा प्रयत्न

Video: चाहत्याने केला सारा अली खानचा किस घेण्याचा प्रयत्न

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सारा आली खान ही सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ती जिथे दिसते, तिथे तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. मात्र काही तरुण आपली मर्यादा ओलंडतात. सारा अली खानचा एक व्हिडिओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यामध्ये काही तरुण-तरूणी सारासोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. मात्र यात एका तरुणाने साराच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर साराच्या बॉडिगार्डने त्याला दूर लोटले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी फॅन्सच्या या अतिपणावर टीका देखील केली आहे.

- Advertisement -

सारा अली खान नियमितपणे जिममध्ये जाते. मुंबईत असल्यावर तिचा दिनक्रम ठरलेला असतो. तिच्या जिमच्या बाहेर अनेकवेळा फॅन्स सेल्फी घेण्यासाठी उभे असतात. काही दिवसांपूर्वी सारा जिममधून बाहेर आल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी जमलेल्या ग्रुपपैकी एका मुलाने तिच्या हाताचे चुंबन घेतले. त्या मुलाच्या कृतीने सारा एकदम घाबरून मागे सरकली. त्यानंतर तिने सर्वांना बाय करत तिथून काढता पाय घेतला.

सारा अली खानसोबत असे पहिल्यांदा होत नाहीये. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. विमानतळावर काही तरुण सेल्फी घेत असताना एका तरुणाने साराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. साराने त्या तरुणाचा हात झटकत लावत थोडे अंतर ठेवून पुन्हा त्या तरुणाला सेल्फी दिला. मात्र कोणताही तक्रार किंवा आकांडतांडव केला नाही. न्यूयॉर्क मधून सुट्टी घालवून ती मुंबई विमानतळावर आली होती. त्यावेळी ही घटना घडली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -