घरमनोरंजनडिंपल कपाडिया नसती तर 'दिल चाहता है' झालाच नसता, फरहान अख्तरने सांगितले कारण

डिंपल कपाडिया नसती तर ‘दिल चाहता है’ झालाच नसता, फरहान अख्तरने सांगितले कारण

Subscribe
बॉलिवूडमधील मल्टी टॅलेंटेड अभिनेता फरहान अख्तरने चित्रपट दिग्दर्शनातून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली. आजवर त्याने अनेक लोकप्रिय सिनेमांचं दिग्दर्शन केलंय. मात्र फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ सिनेमा बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला. या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना,  डिंपल कपाडिया अशी बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट झळकली. मात्र या चित्रपटातील डिंपल कपाडियाची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. तीन मित्रांच्या धमाल रोड ट्रीपच्या कथेसोबतच या सिनेमातील गाणी देखील चांगलीच गाजली होती. या सिनेमाने नुकतीच २० वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने फरहान अख्तरने एका खास अंदाजात या चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले.

फरहान अख्तरने या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे फोटो पोस्ट करत एक स्पेशल मेसेज दिला आहे. पण डिंपल कपाडियाबद्दल फरहान अख्तरने काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. फरहान अख्तरने सांगितले की, जर डिंपल कपाडियाने नकार दिला असता तर ‘दिल चाहता है’ चित्रपट झालाच नसता. तारा भूमिका तिच्यासाठीच होती. मी या सर्व कलाकारांचा नेहमीच आभारी असेन. डिंपल कपाडियाने या चित्रपटात वयस्कर ‘तारा’ या घटस्फोटीत महिलेची भूमिका साकारली होती. ‘तारा’ ही एक अल्कोहॉलिक आणि सोसायटीमध्ये एकटीच राहणारी महिला होती. असे असून ही तिचा बोल्ड, बिंदास्त आणि इंस्पायरिंग असा स्वभाव अनेकांना भावला.


‘C Section डिलीव्हरीवरून स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही,’ उर्मिला निंबाळकरची भावनिक पोस्ट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -