घरमनोरंजनअक्षयच्या 'बेलबॉटम' सिनेमाला शेतकऱ्यांनी केला विरोध, थिएटर बाहेर केली घोषणाबाजी

अक्षयच्या ‘बेलबॉटम’ सिनेमाला शेतकऱ्यांनी केला विरोध, थिएटर बाहेर केली घोषणाबाजी

Subscribe

अक्षयने केलेल्या एका विधानमुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षय विरोधात प्रचंड राग आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळेच शेतकऱ्यांनी अक्षयचा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील सुनावले आहे.

बॉलिवूड(bollywood) खिलाडी अक्षय कुमारचा(Akshay kumar) बहुचर्चित सिनेमा ‘बेलबॉटम'( Bell Bottom) गेल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मसह चित्रपटगृहात रिलीज झाला. कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर हा पहिला असा बिग बजेट सिनेमा आहे की जो थेटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बेलबॉट’ सिनेमाला चाहत्यांनी तसेच समीक्षकांची चांगलीच पसंती मिळाली मात्र, बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात यंदा खिलाडी अक्षय कुमारला यश आले नाही. सिनेमा थिएटरमध्ये पुरता आपटला असं म्हणायला हरकत नाही.अशी परिस्थिती असताना आता सिनेमाच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवासांपासून पंजाब राज्यातील शेतकरी अक्षयच्या ‘बेलबॉटम’ सिनेमा विरोधात थेटर बाहेर उभे राहून विरोध करत आहेत. तसेच ‘शर्म करो अक्षय’ अशी घोषणाबाजी करत आहेत.(Farmers Protest Outside A Theatre Screening film Bell Bottom )

केंद्र सरकारने लागू केलेल्या केंद्रीय कृषी विधेयक कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलन केली होती. यादरम्यान अक्षयने केलेल्या एका विधानमुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षय विरोधात प्रचंड राग आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळेच शेतकऱ्यांनी अक्षयचा सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील सुनावले आहे.

- Advertisement -

 न्यूज 24 ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांनी शनिवारी थिएटर मालकांना सिनेमा रिलीज केल्यास याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे आवाहन केले होते. यापूर्वी देखील अक्षयचा ‘बेलबॉटम’ सिनेमा सौदि अरेबिया आणि कुवैत, कतार मध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घातली आहे.


हे हि वाचा – बिग बींच्या सुरक्षेतील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेची बदली, वर्षाला मिळत होता 1.5 कोटी पगार !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -