घरमनोरंजन''एका बाजूला हसू आणि दुसऱ्या बाजूला आंसू ;'' रवी जाधवांचं राष्ट्रीय...

”एका बाजूला हसू आणि दुसऱ्या बाजूला आंसू ;” रवी जाधवांचं राष्ट्रीय पुरस्कारावर स्पष्ट मत

Subscribe

मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतात, पण असे मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहामध्ये जात नाहीत, सिने दिग्दर्शक रवी जाधव यांनी खंत व्यक्त केली.

मराठी आणि बॉलिवूड मधील चित्रपट नेहमीच चांगलं यश  मिळवतात. काही दिवसांपूर्वीच(national film awards) ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात मराठी आणि बॉलिवूड मधील चित्रपटांना यश मिळाले. मराठी चित्रपट विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर(tanhaji – the unsung warrior) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.  तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणच्या(ajay devgan ) नावाची घोषणा करण्यात आली. ‘गोष्ट एका पैठणीची'(goshat eka paithanichi)  या चित्रपटासोबतच इतरही मराठी चित्रपटांना या पुरस्कार सोहळ्यात यश मिळाले. मराठी चित्रपटांना मिळलेल्या या यशासंदर्भात मराठी सिने दिग्दर्शक रवी जाधव(ravi jadhav) यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

हे ही वाचा – काजोलने बॉलिवूडमध्ये केली ३० वर्ष पूर्ण, पोस्ट शेअर करत अजय देवगणने दिल्या शुभेच्छा

- Advertisement -

दिग्दर्शक रवी जाधव(ravi jadhav) यांच्या टाइमपास ३(time pass 3) या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. प्रेक्षक सुद्धा आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव(ravi jadhav)  नुकतीच यांनी एके ठिकाणी मुलाखत दिली;. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले या संदर्भात त्यांना विचारण्यात आलं तेव्हा रवी जाधव म्हणाले, ‘एका बाजूला हसू आणि दुसऱ्या बाजूला आंसू अश्या माझ्या दोन बाजू आहेत. आनंद या गोष्टीचा होतो, की मराठी चित्रपटांना दरवर्षी किमान आठ ते दहा राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. आणि यामध्ये सातत्य आहे. ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट मराठीमध्ये येत आहेत याचा आनंद सुद्धा आहे.’

- Advertisement -

हे ही वाचा –  तारक मेहता मालिकेला १४ वर्षे पूर्ण: आत्माराम भिडे होणं सोपं नाही; अभिनेत्याने सांगितली ऑफ स्क्रीन गोष्ट

याच संदर्भांत रवी जाधव(ravi jadhav) असंही म्हणाले, ‘पण दु:खाची गोष्ट ही आहे की, हेच चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. राष्ट्रीय चित्रपट मिळवलेले चित्रपट प्रेक्षकांनी सुद्धा पहिले पाहिजेत. त्याचा आनंद सेलिब्रेट केला पाहिजे.’ त्याचबरोबर रवी जाधव म्हणाले ‘हे चित्रपट फेस्टिव्हल मध्ये जाऊन पाहण्यासारखे नाहीत. चित्रपट प्रेमींनी हे चित्रपट चित्रपट गुहांमध्येच जाऊन पाहायला हवेत. तरच या चित्रपटांना खऱ्या अर्थाने पुरस्कार मिळेल, असं मला वाटतं’ असं म्हणत सिने दिग्दर्शक रवी जाधव त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर स्पष्ट मत मांडलं.

हे ही वाचा – ‘गोव्याला गेलो तरी २० – २५ हजार खर्च होतात’. संतोष जुवेकरची दत्तक पालक होण्याचं आवाहन करणारी पोस्ट चर्चेत 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -