वीर दौडले सात…महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा

अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या महेश मांजरेकर यांनी उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलंय. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट साकारण्याकडे त्यांचा विशेष कल असतो. परंतु महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी याबाबत एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

वास्तव या हिंदी लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटानंतर महेश मांजरेकर यांनी खरी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांच्या आई, दे धक्का, पु.ल.देशपांडे, नटसम्राट, लालबाग परळ, वरणभात लोन्चा यांसारख्या अनेक चित्रपटांना ओळख मिळाली. मांजरेकरांनी काल त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये एक महाराष्ट्राचा नकाशा शेअर करण्यात आलाय. त्यावर त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी महाघोषणा असे लिहिले होते. तसेच ही महाघोषणा सकाळी १० वाजता होईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी ही महाघोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

‘वीर दौडले सात’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. मांजरेकरांनी आगामी चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. यासोबत त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार, न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम, मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती…वीर दौडले सात, दिवाळी २०२३, असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वाधिक बजेटचा चित्रपट असणार आहे. विशेष म्हणजे सध्या छत्रपती शिवरायांवर निर्मिती होत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये या चित्रपटाचीही भर पडणार आहे.


हेही वाचा : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड