Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अखेर सुशांतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी फ्लॅटसाठी भाडेकरू मिळाला

अखेर सुशांतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनी फ्लॅटसाठी भाडेकरू मिळाला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले असले तरी अनेकजण अजूनही ही घटना विसरलेले नाहीत. 14 जून 2022 रोजी सुशांतने वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी ज्या घरामध्ये सुशांतने आत्महत्या केली होती तिथे कोणीही भाडेकरु मिळत नसल्याची बातमी समोर आली होती. मागील अडीच वर्षांपासून हा फ्लॅट रिकामा होता आणि यामध्ये राहण्यासाठी कोणीही भाडेकरु तयार देखील नव्हतं. दरम्यान, आता समोर आलेल्या माहितीनुसार या फ्लॅटला भाडेकरु मिळाला आहे.

खरंतर, सुशांतच्या मृत्यूनंतर मागील अडीच वर्षांपासून या फ्लॅट रिकामाच होता. या फ्लॅटचे मालक परदेशात राहतात. त्यांच्या या फ्लॅटचे भाडे 5 लाख रुपये महिना आहे आणि 30 लाख सिक्युरिटी डिपॉजिट आहे.

- Advertisement -

लोक हा फ्लॅट पाहायला घाबरायचे…
मागील काही दिवसांपूर्वी ट्वीटरवर या फ्लॅटचा व्हिडीओ शेअर करत फ्लॅटच्या ऐजंटने सांगितले होते की, “लोक या फ्लॅटमध्ये राहायला घाबरतात. ज्या फ्लॅटमध्ये सुशांतचा मृत्यू झाला तोच फ्लॅट असल्याचे भाडेकरूला कळल्यावर तो एकदाही फ्लॅट पाहायला येत नाही. आता सुशांतच्या मृत्यूची बातमी जुनी झाल्याने लोक निदान फ्लॅट बघायला येत आहेत. मात्र करार अंतिम होत नाही. या घराच्या मालकालाही त्याचे भाडे कमी करायचे नाही. अन्यथा, त्याने असे केले तर ते पटकन विकले जाईल. त्यामुळे लोक त्याच परिसरात इतर प्लॅट खरेदी करण्यास प्राधान्य देतात आहेत.”

4.5 लाख भाडे देऊन सुशांत या फ्लॅटमध्ये राहायचा
सुशांतने डिसेंबर 2019 पासून सुमारे 4.5 लाख प्रति महिना भाड्याने हा फ्लॅट घेतला होता. तो कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान त्याच्या रूममेट्स आणि गर्लफ्रेंड-अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत प्लॅटमध्ये राहत होता. मात्र तो गेल्यापासून हे घर रिकामे करण्यात आले तो गेल्यापासून येथे कोणीही राहायला आलेले नाही.


- Advertisement -

हेही वाचा :

‘ओम शांती ओम’पासून ‘पद्मावत’पर्यंत ‘हे’ आहेत दीपिकाचे सुपरहिट चित्रपट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -