FIR Against Javed Akhtar: RSSबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तरांवर FIR दाखल

FIR Registered Against Javed Akhtar By Mumbai Police Over His Alleged Remarks Against RSS
FIR Against Javed Akhtar: RSSबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तरांवर FIR दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानसोबत केली होती. याप्रकरणी २७ सप्टेंबरला ठाण्याच्या कोर्टाने जावेद अख्तर यांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यावर कारणे दाखवण्यासंदर्भात नोटीस जारी करण्याचा आदेश दिला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आणि संयुक्त दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात आरएसएस कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी खटला दाखल केल्यानंतर अख्तर यांना नुकसान भरपाई म्हणून एक रुपयाची मागणी केली होती. न्यायालयाने नोटीस जारी करण्याचा आदेश केला आणि याचे १२ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागितले होते.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

‘आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल सारख्या संघटनेच्या उद्देश तोच आहे, जो तालिबानचा आहे. जे लोकं आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल सारख्या संघटनेचे समर्थन करतात, त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकतेचा आहे, यात काही शंका नाही, ते रानटी आहेत. पण तुम्ही ज्यांना समर्थन देत असलेल्यांपेक्षात ते वेगळे कुठे आहेत? त्यांची जमीन मजबूत होत असून ते त्यांच्या लक्ष्यकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता एकच आहे,’ असे जावेद अख्तर म्हणाले होते.


हेही वाचा – जावेद अख्तर यांनी तालिबान्यांसोबत केली RSSची तुलना, म्हणाले…