घरमनोरंजन'सम्राट पृथ्वीराज' नंतर अक्षय कुमारचे 'राम सेतू' चित्रपटाकडे लक्ष

‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर अक्षय कुमारचे ‘राम सेतू’ चित्रपटाकडे लक्ष

Subscribe

या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री नुसरत भारूचा आणि जॅकलीन फर्नांडिस सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'राम सेतू'मध्ये अक्षय कुमार एका आर्कियोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे

अभिनेता अक्षय कुमार मागील काही दिवसांपासून ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. शिवाय सम्राट पृथ्वीराज आधी प्रदर्शित झालेला अक्षयचा ‘बच्चन पांडे’ सुद्धा चांगलाच फ्लॉप झाला होता. दरम्यान अक्षयकडे अजूनही बऱ्याच नव्या चित्रपटांची यादी आहे. यांपैकीच ‘राम सेतू’ हा एक चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेत्री नुसरत भारूचा आणि जॅकलीन फर्नांडिस सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘राम सेतू’मध्ये अक्षय कुमार एका आर्कियोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HUNGAMA (@hungamastudio)

 सूत्रांच्या माहितीनुसार, ‘राम सेतू’ हा चित्रपट भारतीय संस्कृतीच्या प्राचीन पौराणिक कलाकृतीच्या शोधावर केंद्रित आहे. जे रामायण आणि महाभारतच्या काळातील आहे. ‘राम सेतू’ देशातील मूळाशी आणि आस्था आणि आध्यात्मिक मान्यतेशी जोडलेले आहे. तसेच या चित्रपटामध्ये अक्षय कुमार या कलाकृतिंची माहिती घेणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारत आहे. तसेच तो आपल्या देशाचा महिमा जगाला सांगत आहे.

- Advertisement -

बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप
सम्राट पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती, मात्र सतत निर्माण झालेल्या चित्रपटाच्या वादामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. ३ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसणार अक्षय कुमार
अक्षय कुमार येत्या काळात मिशन सिंड्रेला, रक्षाबंधन, सेल्फी, गोरखा, ओह माय गोड 2, बडे मिया छोटे मिया आणि मोगुल यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -