घरमनोरंजनVideo: गणेश आचार्य आणि त्याच्या मुलीचा रोमँटिक डान्स पाहून व्हाल थक्क

Video: गणेश आचार्य आणि त्याच्या मुलीचा रोमँटिक डान्स पाहून व्हाल थक्क

Subscribe

सोशल मीडियावर गणेश आचार्य आणि त्यांच्या मुलीचा एक धमाकेदार रोमँटीक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य (Ganesh Acharya)यांनी अनेक नामी हस्तींना त्यांच्या तालावर नाचवले आहे. नुकच सोशल मीडियावर गणेश आचार्य आणि त्यांच्या मुलीचा एक धमाकेदार रोमँटीक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची तुफान चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. गेल्या दोन दशकापेक्षा अधिक काळापासून सिनेसृष्टीत गणेश आचार्य यांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा भला मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी नुकतच मुलगी सौदर्या आचार्य सोबत ‘भीगी भीगी रातो में’ या गाण्यावर कमालीचे नृत्य सादरीकरण केलं आहे. यापुर्वी सुद्दा अनेकदा गणेश आणि सौंदर्या यांनी चाहत्यांसोबत व्हिडिओ शेअर केले आहेत. पण त्यांच्या या डान्सला चाहत्यांनी जास्त पसंती दिली आहे. एका नेटकऱ्याने दोघांचे कौतूक करत लिहले आहे की,  हा रोमँटीक डान्स जगातील सर्वात सुंदर बाप-लेकीचा डान्स आहे.

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ganesh Acharya (@ganeshacharyaa)

- Advertisement -

गणेश आचार्य यांच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दी विषयी सांगायचे झाल्यास त्यांनी फक्त हिंदीतल्याच नामवंत चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन केले नाही तर मराठी,भोजपुरी या भाषिक चित्रपटांचेही नृत्य दिग्दर्शन केलं आहे. ‘लय भारी’ या चित्रपटातल्या होळीच्या गाण्यासाठीच्या नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. ‘चिमणी उडाली भूर्र’ या मराठी गाण्यात त्यांचे घडलेले दर्शन अनेक चाहत्यांना त्यांच्यासारखीच स्टेप्स करायला भाग पाडते. एबीसीडी, ‘एनी बडी कॅन डान्स, यासारख्या चित्रपटात गणेश यांनी अपल्या अभिनयाचे दर्शन देखील घडवले.


हे हि वाचा – Hbd Kriti Sanon- सुशांत सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कृतिने केलं होतं कबुल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -