घरमनोरंजनOTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट

OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट

Subscribe

गंगूबाई काठियावाडी याचे पोस्ट रिलीज डिजिटल राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ७० कोटींमध्ये खरेदी केले

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. मात्र आता या चित्रपटासंबंधी आणखी एक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे डिजिटल राइट्स ओटीटी प्लेटफॉर्मला विकण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले असून हे राइट्स विकत घेण्यासाठी नेटफ्लिक्सने बडी रक्कम मोजल्याचे सांगितले जात आहे. नेटफ्लिक्स ७० कोटी रूपये दिले असल्याचे माहिती आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगूबाई काठियावाडी याचे पोस्ट रिलीज डिजिटल राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ७० कोटींमध्ये खरेदी केले आहेत. चित्रपटाची स्टार कास्ट आणि संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट असल्याने नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे राइट्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. या चित्रपटात शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यासह अजय देवगन, इमरान हाश्मी आणि हुमा कुरेशी विशेष भूमिकेत टॅप करताना दिसणार आहेत.

- Advertisement -

या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. सध्या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. गंगूबाईच्या कुटुंबियांनी २२ डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला होता. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांनी देखील चित्रपटाबद्दल काही आक्षेपही घेतले होते.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -