घरमनोरंजनदिग्दर्शक तेजस लोखंडे वेबविश्वात करणार पदार्पण

दिग्दर्शक तेजस लोखंडे वेबविश्वात करणार पदार्पण

Subscribe

मालिकेनंतर आता दिग्दर्शक तेजस लोखंडे डिजीटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

सध्या वेब सिरीज पाहणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी डिजीटलकडे आपला मोर्चा वळवला आहे. आता दिग्दर्शक तेजस लोखंडे मालिकेनंतर डिजीटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तसेच वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. या वेबसिरीजची निर्मिती ‘चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट’, ‘चंद्रप्रकाश यादव’ आणि ‘प्रशांत सावंत’ हे करत आहेत. मात्र, यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

हिंदी मालिकांचेही केले दिग्दर्शन

दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ याने मराठी नव्हे तर हिंदी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. त्याने आजवर अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले अशा लोकप्रिय मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर सास बिना ससुराल, फिरंगी बहू, छन छन अशा हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाला दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’?

दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ डिजीटल पदार्पणाविषयी सांगतो, ”मला वेबसिरीजचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती आणि त्याच दरम्यान माझ्याकडे सस्पेन्स थ्रिलरची स्क्रिप्ट आली आणि मी वेबसिरीज करण्याचे ठरवले. तसेच शुटिंग दरम्यान मला नविन गोष्टी शिकता आल्या.”


हेही वाचा – बिग बॉस फेम स्वामी ओम यांचे निधन

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -