घरताज्या घडामोडीCoronaVirus: गौरी खान पुढे सरसावली, केली ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय!

CoronaVirus: गौरी खान पुढे सरसावली, केली ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय!

Subscribe

देशभरात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक जण या संकटाला तोंड देण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. बॉलिवूड कलाकारांपासून क्रिकेटर देखील या संकटात मदत करत आहे. बॉलिवूडचा किंग खान आणि त्यांची पत्नी गौरी खान एकत्र येऊन या संकटात मदत करत आहे. शाहरुख खानने महाराष्ट्रात २५ हजार पीपीई किट्सची मदत केली आहे. त्यानंतर आता पत्नी गौरी खानने देखील मुंबईतील गरिबांना मदत करत असल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे मुंबईत लॉकडाऊन दरम्यान कठीण परिस्थिती तोंड देणाऱ्या गरीब लोकांना मदत केली आहे. आतापर्यंत ९५ हजार लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. याबाबतची सर्व प्रकारची माहिती गौरी खानने तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

- Advertisement -

आपल्या मीर फाउंडेशनची पोस्ट शेअर करताना गौरी खानने सांगितले आहे की, ‘रोटी फाउंडेशन आणि मीर फाउंडेशनच्या सहकार्याने मुंबईतील गरीब लोकांना ९५ हजार जेवाणाचे पाकिटे दिली आहेत. ही फक्त सुरुवात आहे. अजून अशाप्रकारची बरीच काम बाकी आहेत.’ तसंच गौरी खानने या कठीण परिस्थितीत मीर फाउंडेशनतर्फे होत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

या कोरोना व्हायरसच्या संकटात शाहरुख खानने मदतीसाठी पैसे देण्यासोबत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. आता पुन्हा एकदा शाहरुख मोठे पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – Corona: शाहरुख खान याची सरकारला मदत; आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -