घरCORONA UPDATEजेनेलिया, रितेश देशमुख यांची चित्रपट महामंडळाला भरघोस मदत!

जेनेलिया, रितेश देशमुख यांची चित्रपट महामंडळाला भरघोस मदत!

Subscribe

जागतिक कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. याचा सगळ्यात मोठा फटका चित्रपटसृष्टीला बसला आहे. नविन चित्रपटांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या बॅक स्टेज कलाकारांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली.

आतापर्यंत २००० सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोहचवली गेली आहे. परंतु महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी व संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती व बाँलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते.

- Advertisement -

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री जिनीलिया रितेश देशमुख व रितेश विलासराव देशमुख हे दांपत्य धावून आले व त्यांनी त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीतर्फे दहा लाखांची मदत केली आहे. तसेच त्यांनीही इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन ही केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -