घरमनोरंजन‘इमर्जन्सी’मधून जगजीवन राम यांची भूमिका साकारणार 'हा' अभिनेता

‘इमर्जन्सी’मधून जगजीवन राम यांची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

Subscribe

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटात जगजीवन राम ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सतीश कौशिकचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

बॉलिवूडची धाकड गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना रनौत वारंवार तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. येत्या काळात कंगनाचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनाने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील हळूहळू एकएक पात्र साकारणाऱ्या कलाकारांचा फर्स्ट लूक समोर येत आहे. नुकताच या चित्रपटामध्ये जगजीवन राम ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटात जगजीवन राम ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सतीश कौशिकचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबतच खाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, शेवटचं आहे परंतु उत्तम आहे. तुम्हा सर्वांच्या समोर गुण, कौशल्यांचा खजिना सतीश कौशिकचा फर्स्ट लूक सादर करत आहे. जो ‘इमर्जन्सी’मध्ये जगजीवन ही भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

जगजीवन राम लोकप्रिय नेत्यांपैकी एक

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना रनौतने पुढे कॅप्शनमध्ये लिहिलंय की, जगजीवन राम यांना बाबूजी देखील म्हटले जायचे. ते भारतीय राजकारणाच्या इतिहासामधील सर्वात प्रसिद्ध नेत्यांमधील एक होते. त्यांनी जय प्रकाश नारायण यांच्यासोबत इंदिरा गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले होते 25 जून 1975 साली इंदिरा गांधींकडून संपूर्ण देशभरामध्ये 21 महिने लावण्यात आलेल्या ‘इमर्जन्सी’च्या घटनेला हा चित्रपट पडद्यावर दाखवणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर नेटकरी चित्रपटात निवडल्या गेलेल्या कास्टिंगचं कौतुक करू लागले आहेत. सतीश कौशिक व्यतिरिक्त याआधी या चित्रपटातून कंगना रनौत, अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, विशाक नायर यांचा लूक शेअर करण्यात आला आहे.ॉ


हेही वाचा :

कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’मध्ये हा अभिनेता साकारणार संजय गांधींची भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -