घरताज्या घडामोडीJaved Akhtar: कंगना रनौतला मुंबई हायकोर्टाचा मोठा दणका

Javed Akhtar: कंगना रनौतला मुंबई हायकोर्टाचा मोठा दणका

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीची केस दाखल केली होती. हे प्रकरण रद्द करण्याची याचिका कंगनाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. पण हायकोर्टाने कंगनाची ही याचिका फेटाळून लावली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप लावले होते. ज्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीची केस दाखल होती.

- Advertisement -

दरम्यान सुशांत सिंह राजूपतच्या केस नंतर कंगनाने टीव्हीवर मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने जावेद अख्तर यांच्यावर चुकीचे आरोप केले होते. ज्यानंतर नोव्हेंबर २०२०मध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचे तक्रार दाखल केली. मग त्यानंतर १ मार्चला दंडाधिकारीने कंगनाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. मग २५ मार्चला कंगनाला जामीन मिळाला होता.

त्यानंतर कंगनाने याप्रकरणी मानहानीची केस रद्द करण्यासाठी मागणी करणारी याचिका दाखल केली. जावेद अख्तर यांनी कंगनाची ही याचिका फेटाळण्याची विनंती हायकोर्टाला केली. अख्तर म्हणाले की, कंगनाच्या आरोपामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. अख्तर यांचे वकील एन.के भारद्वारे म्हणाले की, दंडाधिकारी कोर्टाने नियमांचे पालन करत कंगना विरोधात कारवाई केली आहे. आता कोर्टाने कंगनाची याचिका फेटाळली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काय सांगताय, बबीताजी वयाने ९ वर्षे छोट्या टप्पूला करतेय डेट!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -