घरमनोरंजनआणि हृतिक झाला भावूक

आणि हृतिक झाला भावूक

Subscribe

मागील अनेक काळापासून हृतिक रोशन आपली मैत्रिण आणि पूर्व पत्नी सुझेन खान मागील अनेक महिन्यांपासून विभक्त राहतात. सुझेनबद्दल हृतिकने नुकतीच एक भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता हृतिक रोशन आपली मैत्रिण आणि पूर्व पत्नी सुझेन खान मागील १४ वर्षांपासून विवाहबंधनात असून २०१४ मध्ये विभक्त झालेत. दोघांमध्ये उदभवलेल्या वादांमुळे ते चर्चेचा  विषय बनले. दोघांनी एक दुसऱ्याला बघायचेही नसल्याचे सांगितले होते. मात्र अजूनही हृतिकला सुझेनची आठवण येत आहे. नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवरुन हृतिकने भावनात्मक पोस्ट शेअर केली आहे. ही भावनात्मक पोस्ट सुझेन संंबधीत होती. यानंतर हृतिक अजूनही सुजेनला मिस करत असल्याचे दिसून येत आहे. हृतिक आणि सुजेनमध्ये कितीही मतभेद असोत मात्र तरीही हे दोघे एकमेकांवर कधीही टीका करत नाहीत. नाते संपली तरी प्रेम संपत नाही अशी पोस्ट त्याने केली.

काय म्हणाला हृतिक 

“हृतिकने सुजेनला जवळची मैत्रिण सुजेन बद्दल लिहिले की, “ही आहे सुझेन, माझी जवळची मैत्रीण (पूर्व पत्नी) जी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवते आहे. हा एक खास क्षण आहे. आपण लांब असूनही एकत्र राहू शकतो ही गोष्ट माझ्या मुलांना हा क्षण शिकवतो.”- हृतिक रोशन, अभिनेता

- Advertisement -

 आगामी चित्रपटाती तयारी सुरु

छट पूजेच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणजेच हृतिक रोशन याने बिहारी नागरिकांना शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा देतांनाचा व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत ट्विटरवर टाकला होता. हृतिक रोशन आपल्या आगामी चित्रपटाची तयारी करतोय. हृतिकचा आगामी चित्रपट ‘सुपर ३०’मध्ये तो एक बिहारी माणसाची भूमिका करतोय. बिहारी भूमिकेदरम्यान त्याला छटपूजेचे महत्व कळत असल्याचे त्याने सांगितले होते. आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारी सुरु असल्याचेही त्याने सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -