घरमनोरंजनमी तिरुपतीमध्ये लग्न करणार... प्रभासने लग्नाबद्दल केला खुलासा

मी तिरुपतीमध्ये लग्न करणार… प्रभासने लग्नाबद्दल केला खुलासा

Subscribe

प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होती ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची टीम जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, नुकताच तिरुपतीमध्ये या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट झाला, ज्यामध्ये प्रभासने त्याच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.

“मी तिरुपतीमध्ये लग्न करणार”

‘आदिपुरुष’च्या अंतिम ट्रेलर लाँच वेळी, चाहत्यांनी त्याला त्याच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न विचारले तेव्हा प्रभास म्हणाला की,”मी तिरुपतीमध्ये लग्न करणार आहे.” प्रभासच्या या विधानानंतर प्रभास ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर लग्नाची बातमी सांगणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय यावेळी प्रभासने सांगितले की, तो दरवर्षी किमान 2 चित्रपट तरी करणार आहे. शक्य झाल्यास तो चित्रपटही करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

दरम्यान, तिरुपतीमध्ये प्री-रिलीज इव्हेंट पार पडण्यापूर्वी प्रभासने तिरुपती बालाजीचं दर्शन देखील घेतलं होतं. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

- Advertisement -

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी प्रभासने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -