Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ड्रग्स प्रकरणात आता 'या' अभिनेत्याचे नाव आले समोर

ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याचे नाव आले समोर

नुकतच 'शादाब बटाटा नामक' एका ड्रग्ज पेडरला अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्याने या अभिनेत्याचे नाव घेतले आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीमध्ये अनेक ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले आहे. अमली पदार्थ पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. विशेष म्हणजे या चौकशीदरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती. या यादीत आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता एजाज खान याचे नाव जोडले गेले आहे. एजाजला ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपाखाली एन.सी.बी. ने मंगळवारी ताब्यात घेतले आहे. नुकतच ‘शादाब बटाटा नामक’ एका ड्रग्ज पेडरला अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान त्याने एजाजचे नाव घेतले आहे. त्यामुळे सध्या एजाजची एन.सी.बी. कडून चौकशी सुरु आहे. यात लक्षवेधी बाब म्हणजे एजाजने देखील दोन टीव्ही कलाकारांची नावे घेतली आहे. हे कलाकार मुंबईतील लोखंडवाला परिसरात राहतात. एन. सी. बी. अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला होता. मात्र अधिकारी घरी पोहोचण्यापूर्वीच ते घरातून फरार झाले. पोलिसांद्वारे या कलाकारांचा शोध सुरु आहे. शिवाय हे कलाकाल ज्या सेलिब्रिटींच्या संपर्कात होते त्यांची देखील आता चौकशी केली जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan)

 ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी.ने ताब्यात घेतलेला एजाज खान हा बीग बॉस ७ मधला स्पर्धक होता. मात्र भरपूर लोकांनी बिग बॉस ७ मधील एजाजला बिग बॉस १४ मधील एजाज खान समजले होते. या गैरसमजांमुळे बिग बॉस 14 चे स्पर्धक इजाज इतके नाराज झाले की त्यांना ट्विटद्वारे या विषयावर स्पष्टीकरण सादर करावे लागले. यामुळे नाराज इजाज खानने प्रेक्षकांसोबत एक पोस्ट शेअर करत, मी तो नाही.. मला या गोंधळाचा कंटाळ आला आहे असे स्पष्टीकरण दिले.

- Advertisement -

eijaz khan, ajaz khan

 

- Advertisement -

 यासोबतच त्याने आपले आणि इजाज खान यांच्या नावाचे स्पेल लिहून प्रत्येकाचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.’ज्या लोकांना अजूनही मला अटक झाली आहे असे वाटते, त्यांनी चष्मा घालायला पाहिजे.’ असेही तो म्हणाला होता.


हे वाचा- वाढदिवसादिवशी अजयचा ‘आरआरआर’मधील फर्स्ट लूक

- Advertisement -