घरमनोरंजनइंडियन प्रो म्युझिक लिग' चा २६ फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा

इंडियन प्रो म्युझिक लिग’ चा २६ फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा

Subscribe

हा शो झी टिव्ही आणि झी फाय वर पाहता येणार आहे.

झी टिव्ही वाहिनीवर एक हाय बजेट ‘इंडियन प्रो म्युझिक लिग’ हा नवा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रिअॅलिटी शो चा उद्घाटन सोहळा २६ फेब्रुवारीला म्हणजे आज संध्याकाळी ८ वाजता पार पडणार आहे. या नव्या शोमध्ये सहा भारतीय टीम आहेत. अकरा सेलिब्रिटी राजदूत असणार आहेत, तर अठरा लोकप्रिय गायक आहेत. यामध्ये बॉलिवूडचे भाईजान सलमान खान देखील असणार आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांचा सहभाग आहे. त्यांनी सोशल मिडियाद्वारे ‘इंडियन प्रो म्युझिक लिग’ बाबत फोटो शेअर केले आहेत. हा शो झी टिव्ही आणि झी फाय वर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE TV (@zeetv)

- Advertisement -

‘या’ कलाकारांचा असणार समावेश

इंडियन प्रो म्युझिक लिग श्रद्धा कपूर सोबत त्यांचा भाऊ सिंद्धात कपूर आणि वडिल शक्ति कपूर असणार आहे . गोविंदा सोबतच त्याची पत्नी सुनीता, रितेश देशमुख सोबत पत्नी जेनेलियासुद्धा असणार आहे.
इंडियन प्रो म्युझिक लीगमध्ये मुंबई वॉरियर्स, दिल्ली स्क्वॉड्स, यूपी दबंगस, पंजाब लायन्स, बंगाल टायगर्स आणि गुजरात रॉकर्स या सहा प्रादेशिक संघांचे विविध प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहेत.

प्रत्येक टीम भारतातील विविध क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे. या टीममध्ये एक प्रसिद्ध पार्श्व गायक, एक पुरुष आणि एक महिला गायक कॅप्टन असणार आहेत. यामध्ये मिल्खा सिंह, कैलाश खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमि त्रिवेदी, अकृति काकर, पायल देव, नेहा भसिन, शिल्पा राव यांनी टीमचे कॅप्टन होण्यासाठी साइन केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कोरोनामुळे नागपूर विद्यापीठच्या‘बीएड’च्या परीक्षा उशीराने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -