घरट्रेंडिंगइंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये नेहाला चाहत्याचं किस

इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये नेहाला चाहत्याचं किस

Subscribe

इंडियन आयडलचा ११ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये नेहाला तिच्या चाहत्याने केलेल्या किसची.

इंडियन आयडलच्या ऑडिशनमध्ये सिंगर नेहा कक्कर हिला एका स्पर्धकाने किस केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, इंडियन आयडलचा ११ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनसाठी स्पर्धकांची निवड देखील अंतिम टप्प्यात आहे. असाच एक स्पर्धक आणि नेहा कक्करचा चाहता इंडियन आयडलच्या मंचावर आला. स्पर्धकाने येताना नेहासाठी बरेचसे गिफ्ट्स आणले होते. ते घेण्यासाठी आणि आपल्या चाहत्याला भेटण्यासाठी म्हणून नेहा मंचावर गेली असता या स्पर्धकाने नेहाला अचानक गालावर किस केली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धकांच्या ऑडिशनची झलक पाहायला मिळत आहे. सर्व स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर परिक्षक खूप खूश आहेत. पण व्हिडीओच्या शेवटी एक स्पर्धक खूप सारे गिफ्ट घेऊन पोहोचतो. हे सर्व गिफ्ट नेहाला देतो. नेहा त्यावर खूश होऊन त्याला मिठी मारते. पण, तेवढ्यात तो नेहाला गालावर किस करतो. शो होस्ट आदित्य नारायण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि नेहा सुद्धा लगेचच तिथून बाजूला होते. या घटनेमुळे दुसरे परिक्षकही हैराण होतात. सध्या या व्हिडीओमुळे इंडियन आयडलचं ११ वं सीझन मात्र नेहमीच चर्चेत राहिल यात शंका नाही.

- Advertisement -

या शोच्या ऑडिशन दरम्यान नेहा रडताना ही दिसते. एका स्पर्धकाने सांगितलेल्या आठवणींमुळे नेहाला अश्रू अनावर होतानाचा ही व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जन्मापासून दृष्टी नसलेल्या स्पर्धकाला नेहा विचारते तुमच्या चेहऱ्यावर डाग कसले आहेत. यावर उत्तर देताना स्पर्धक आपली जुनी आठवण सांगतो आणि नेहा रडायला लागते. स्पर्धक अविनाश सांगतो, माझा चेहरा जळला होता आणि ही आग मी स्वतःच लावली होती. मी पाहू शकत नाही. यामुळे कंटाळून मी स्वतःला आग लावून संपवण्याचा प्रयत्न केला. या ऑडिशनमध्ये अविनाशने गायक राहत फतेह अली खान याचं ‘तू ना जाने आस-पास है खुदा’ हे गाणं गायलं होतं. अविनाशचं गाणं ऐकल्यावर नेहा रडू लागते.

- Advertisement -

हेही वाचा – नेहा कक्कर एका जमान्यात होती भजनी गायक; आज बॉलिवूडची टॉप गायिका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -