घरमुंबईरस्ता क्रॉस करणार्‍या वयोवृद्धाचा अपघातात मृत्यू

रस्ता क्रॉस करणार्‍या वयोवृद्धाचा अपघातात मृत्यू

Subscribe

फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या या वयोवृद्ध व्यक्तीला भरवेगात येणार बाईकस्वाराने धडक दिली. यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रस्ता क्रॉस करणार्‍या एका ८५ वर्षांच्या वयोवृद्धाचा बाईकची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना पवई परिसरात घडली. याप्रकरणी अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी बाईकस्वारा विरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा अपघात गुरुवारी १० ऑक्टोबरला सकाळी सव्वा दहा ते साडे दहा वाजता पवईतील साकी विहार रोड, एल अ‍ॅण्ड टी गेट क्रमांक दोनजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नक्की काय घडले?

विपत केवट हे त्यांच्या कुटुंबियांसोबत पवई येथील म्हाडा कॉलनी, मिलिंद नगरात राहत होते. १० ऑक्टोबरला ते फेरफटका मारण्यासाठी घरातून निघाले. एल अ‍ॅण्ड टी गेट क्रमांक दोनजवळ ते रस्ता क्रॉस करीत होते, यावेळी तेथून भरवेगात जाणार्‍या एका बाईकस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात विपत केवट हे गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातानंतर बाईकस्वार तेथून पळून गेला होता.

- Advertisement -

बाईकस्वाराचा अद्यापही पोलीस शोध घेत आहे

अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या विपत यांना पोलिसांनी जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. तिथेच उपचार सुरू असतानाच तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा गोबरीप्रसाद केवट याने मंगळवारी गुन्हा नोंदवला असून अजूनही पोलीस या बाईकस्वाराचा शोध घेत आहे.


हेही वाचासात वर्षांपूर्वीच आरोपीचा मृत्यू; २७ वर्षानंतर गुन्ह्याचा उलगडा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -