घरमनोरंजनशाहरुखच्या चाहतीला नाही आवडला 'पठाण', व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

शाहरुखच्या चाहतीला नाही आवडला ‘पठाण’, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. ‘पठाण’ चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 12 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. चाहते या चित्रपटाचं प्रचंड कौतुक करताना दिसून येत आहेत. अशातच शाहरुखच्या एका चाहतीला हा चित्रपट आवडला नाही, या चाहतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ती ‘पठाण’ चित्रपट आवडला नसल्याचं म्हणत आहे. इतकंच नव्हे तर हा व्हिडीओ स्वतः शाहरुखने शेअर केला आहे.

शाहरुखने शेअर केला छोट्या चाहतीचा व्हिडीओ शेअर

अभिषेक कुमार नावाच्या एक व्यक्तीने ट्वीटर एका लहान मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ सोबत शाहरुख खानला देखील टॅग केलंय. या व्हिडीओत एक व्यक्ती लहान मुलीला विचारतो की, “आहना, कोणता चित्रपट पाहून आली?” यावर ती लहान मुलगी ‘पठाण’ असं म्हणते. त्यानंतर तो व्यक्ती तुला ‘पठाण’ आवडला? असा तिला प्रश्न विचारला. त्यावर ती ‘नाही’ असं म्हणते.

- Advertisement -

दरम्यान, शाहरुखने या ट्वीटवर रीट्वीटवर करत लिहिलंय की, “ओह…ओह! अजून आणखी मेहनत घ्यायची आहे. ड्रॉईंग बोर्डवर पुन्हा येण्यासाठी तरुणांना आम्ही निराश नाही करु शकत शेवटी देशाच्या युवकांचा प्रश्न आहे. कृपया तिला डीडीएलजे ट्राय करा. कदाचित तो रोमाँटिक आहे…मुलांना आम्ही नाही ओळखत.”

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

भारतातील अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे.


हेही वाचा  :

बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यावर कंगना रणौतने केले गंभीर आरोप

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -