घरमनोरंजनदिवंगत कलाकार इरफान खान यांच्या कबरीवर लावले जाणार रातराणीचे झाड

दिवंगत कलाकार इरफान खान यांच्या कबरीवर लावले जाणार रातराणीचे झाड

Subscribe

कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त झालेल्या अभिनेता इरफान खान यांनी २९ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. मात्र तो अपयशी ठरला. त्यांचा अंत्यविधी वर्सोवा येथील कब्रिस्ताना दफनक्रियेतून केला गेला. दरम्यान, इरफान यांची पत्नी आणि मुलांनी आज एक भावनिक संदेश ट्विटर हँडल्या माध्यमातून दिला आहे. इरफान यांची पत्नी सुतपा सिकदर, मुलगा बाबिल आणि अयान यांनी हा संदेश देत इरफानवर इलाज केलेल्या डॉक्टर्सचे आभार त्यांनी मानले आहेत. यामध्ये इरफान खान यांच्या कबरीवर त्यांचे आवडते रातराणीचे झाड लावण्यात येणार असल्याचेही या संदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे भावनिक पत्रात

सुरूवातील या पत्रामध्ये इरफान यांची पत्नी आणि मुलांनी यांनी इरफान यांच्या जाण्याचे दुःख संपूर्ण देशाला झाले असताना मी याला वैयक्तित संदेश कसं काय म्हणू शकते, असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी इरफान यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहे. आमचे आयुष्य एक कथेसारखे झाले आहे. ज्या एका नको असलेल्या पाहुण्याची (न्युरोएंडोक्राइन ट्यूमर) एंट्री होते. त्याच्याशी आमचा सामना सुरू होता. त्याच्यानुसार आपलं आयुष्य बदलायला आम्ही शिकलो होतो. आमचे आयुष्य एक अभिनय शाळा बनून राहिलं होतं. डॉक्टरांचा रिपोर्ट हा पटकथेसारखा वाटू लागला होता. ज्याला मी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे डॉक्टरांची कोणतीच गोष्ट कधीही दुर्लक्ष केली नाही, जे चांगल्या कलाकाराकडून अपेक्षित असते, असे इरफानच्या अंदाजात पत्रकामध्ये लिहीले होते. पत्राच्या शेवटी सांगण्यात आले की, त्यांच्या कबरीवर त्यांचे आवडते रातराणीच्या फुलांचे झाड लावले जाईल. त्याला फुलं येण्यास उशीर लागेल पण ते त्या सर्व चाहत्यांपर्यंत दर्वळ पोहोचवेल जे आता त्यांचे चाहते नाही तर कुटुंबिय बनले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

CoronaVirus:  राज्यात ८७ हजार गुन्हे दाखल तर १७ हजार व्यक्तींना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -