“हा तर वडापाव सारखा”……अल्लू अर्जुनचं वाढलेले वजन पाहून युजर्सने केलं ट्रोल

अल्लू अर्जुनचे हे वाढलेले वजन पाहून एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, "हा तर रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखा दिसत आहे. साउथ चे लोक अशा भिकाऱ्यासाठी पागल आहेत

टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पुष्पाच्या स्टाईलचं वेड संपूर्ण भारतभर पसरले होते. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचे चाहते अल्लू अर्जुनच्या अनेक नव्या अपडेट कडे लक्ष ठेऊन असतात. याचं दरम्यान अल्लू अर्जुनचे वजन वाढलेले सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. अल्लू अर्जुनचे वाढलेले वजन पाहून आता युजर्स त्याला ट्रोल करू लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

या व्हायरल फोटोमध्ये अल्लू अर्जुनने हलक्या निळ्या रंगाचा प्रिंटेड टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउजर परिधान केलेली आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुनचे वाढलेले वजन अगदी स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स त्याच्यावर अनेक कमेंट करत आहेत.

युजर्सच्या कमेंट

अल्लू अर्जुनचे हे वाढलेले वजन पाहून एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हा तर रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखा दिसत आहे. साउथ चे लोक अशा भिकाऱ्यासाठी पागल आहेत”. तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “हा टी-शर्ट कुठुन घेतला?”, तिसऱ्या एकाने लिहिलं की, “हा तर दिवसेंदिवस म्हातारा होतोय”, अजून एकाने लिहिलंय की, “हा तर वडापाव सारखा दिसतोय”. तसेच काहीजणांनी अंदाज लावला आहे की, अल्लू अर्जुनने पुष्पा २ साठी वजन वाढवले असेल.

अल्लू अर्जुनच्या स्टाईलचे दिवाने आहेत लोक
अल्लू अर्जुनला गेल्या वर्षी ‘पुष्पा’ या चित्रपटामधील त्याच्या देशी दमदार स्टाईलसाठी खूप पसंती मिळाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून यात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मंदाना सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून आली होती. आता प्रेक्षक ‘पुष्पा २’ या चित्रपटाची वाट पाहत आहेत.