Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन जॅकी श्रॉफ म्हणतायतं, 'लेकीसाठी मुलगा शोधणं झालयं कठीण'

जॅकी श्रॉफ म्हणतायतं, ‘लेकीसाठी मुलगा शोधणं झालयं कठीण’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ नवनव्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. लेकीच्या रिलेशनशिपवर आता खुद्द जॅकी श्रॉफ यांनी उत्तर दिले आहे. माझे रिलेशनशिप असलेला एकही मुलगा माझ्या डॅडला आवडला नाही. यावरून मी त्यांना ब्लेम करणार नाही. कारण ते योग्य बोलतात. असं कृष्णा म्हणाली होती. यावरून एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांना विचारणा करण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, मी तिच्या पर्सनल लाईफमध्ये जास्त ढवळाढवळ करत नाही. पण माझ्या लेकीसाठी मुलगा शोधणं फार कठीण काम आहे. असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

तसेच जॅकी श्रॉफ पुढे सांगतात, तिने कोणासोबत आयुष्य घालवायेचं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. कारण आई-बाबा तिला आयुष्यभर पुरणारं नाहीत. पण तिला एक उत्तम पार्टनर शोधावा लागेल जो तिच्यावर प्रेम करेल, तिची काळजी घेईल. पण माझ्या मुलीसाठी मुलगा शोधणे फार कठीण कामं आहे. असेही ते सांगतात.

- Advertisement -

माझी दोन्ही मुलं कृष्णा व टायगर मनाने खुप स्वच्छ आणि पारदर्शक आहेत. मी नशीबवान आहे की देवाने मला अशी मुलं दिली. त्यांच्या मनात कुठलंही कपट नाही. अधिक मेहनती असून दोघेही अनुभवातून शिकतायतं. असेही जॅकी सांगतात.


- Advertisement -