घरमनोरंजनजॅकलीनने 'योलो' फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला केली सुरुवात; सर्वात आधी पोहोचली इथे!

जॅकलीनने ‘योलो’ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला केली सुरुवात; सर्वात आधी पोहोचली इथे!

Subscribe

पुरोग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठी कार्य, जॅकलिने आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे.

जॅकलीन फर्नांडीसने समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. जॅकलिनने स्थापन केलेली ‘यू ओनली लिव वन्स’ (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. पुरोग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठी कार्य, जॅकलिने आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे. जॅकलीनने ‘रोटी बँक फाउंडेशन’सोबत मिळून एकत्रपणे काम करता यावे या उद्देशाने नुकतीच ‘रोटी बँक फाउंडेशन’च्या स्वयंपाकघराला भेट दिली. रोटी बँक टीम आणि आपली YOLO टीमसोबत जॅकलीनने त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहयोग दिला आणि त्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप देखील केले.

 या अनुभवाविषयी अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, “आपल्याकडे एकच जीवन आहे, या जगात जे काही आपल्याला करता येईल ते केले पाहिजे. मी येलो फाउंडेशन लॉंच केले, त्यावर मला गर्व आहे. चांगुलपणाच्या कथा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली आहे. या आव्हानात्मक काळात मी, योलो फाउंडेशने प्रत्येक समाजसेवी संस्थांसोबत भागिदारी केली आहे. जे शक्य आहे ते सर्व आम्ही करतो!” अशी पोस्ट जॅकलीनने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, जॅकलीन मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेणार आहे.

- Advertisement -

हे वाचा-  बॉलिवूड अभिनेता हरीश पटेल दिसणार ‘मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सच्या’ चित्रपटात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -