घरताज्या घडामोडीUP Assembly Election 2022 : उद्या लखनौला त्सुनामी धडकणार, स्वामी प्रसाद मौर्यांचा...

UP Assembly Election 2022 : उद्या लखनौला त्सुनामी धडकणार, स्वामी प्रसाद मौर्यांचा भाजपला इशारा

Subscribe

समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बैठका झाल्या. यावेळी उद्या लखनौला त्सुनामी धडकणार असल्याचा इशारा स्वामी प्रसाद मौर्यांनी भाजपला दिला आहे.

उद्या लखनौला त्सुनामी धडकणार

स्वामी प्रसाद मौर्यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बैठकीनंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ३० ते ३५ सर्मथकांच्या गाठीभेट घालून दिल्या आहेत. दरम्यान, उद्या लखनौला त्सुनामी धडकणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगलाच हादरा बसणार असल्याचं स्वामी प्रसाद मोर्यांनी म्हटलंय. त्याचसोबतच २०१७ साली जो आकडा होता. त्याच आकड्यांवर भाजप पक्ष पुन्हा जाणार असल्याचा इशारा मौर्यांनी दिला आहे. १४ जानेवारीला शेवटचा आणि मोठा धमाका करणार असल्याचं मौर्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

यूपी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल

स्वामी मौर्य यांनी भाजपला राजीनामा दिल्यानंतर यूपी सरकारसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील हल्लाबोल केला आहे. मौर्यांनी ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाग आणि भाजपला साप असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी स्वत:ला नेवला असं म्हटलंय. नागरूपी आरएसएस आणि सापाच्या रूपात असणाऱ्या भाजपला स्वामी रूपातील नेवला यूपीमधून धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही, असं ट्विट स्वामी मोर्यांनी केलं होतं.

- Advertisement -

सपा आणि आरएलडी या युती पक्षाने २९उमेदवारांची नावे जाहीर करण्याआधी काँग्रेसकडून निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ही यादी जाहीर केली असून १२५ उमेदवारांपैकी ५० उमेदवारांनी संधी देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांच्या या यादीत उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाचाही समावेश आहे.


हेही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीवेळी एटीएस अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे – नसीम खान


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -