घरमनोरंजनजेनिफर विंगेट करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

जेनिफर विंगेट करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

कार्तिक आर्यनसोबत जेनिफर विगेंटला अप्रोच करण्यात आलेलं आहे. मात्र अजून याबाबत कोणता खुलासा झालेला नाही. परंतु ही बातमी खरी झाली तर टेलिव्हिजनवरील ही सुंदर अभिनेत्री बॉलिवूडच्या सिलव्हर स्क्रीनवर दिसेल

हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जेनिफर विंगेट आता टेलिव्हिजननंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जेनिफर विंगेटला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे. मात्र अजून याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही परंतु ही बातमी ऐकूण जेनिफर विंगेटचे चाहते खूप खूश झाले आहेत.

कार्तिक आर्यन करणार काम
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार कार्तिक आर्यनसोबत जेनिफर विंगेटला अप्रोच करण्यात आलेलं आहे. मात्र अजून याबाबत कोणता खुलासा झालेला नाही. परंतु ही बातमी खरी झाली तर टेलिव्हिजनवरील ही सुंदर अभिनेत्री बॉलिवूडच्या सिलव्हर स्क्रीनवर दिसेल. जेनिफर विंगेटने आत्तापर्यंत बऱ्याच प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलेले आहे. त्यापैकीच सरस्वतीचंद्र, बेहद, बेपनाह या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

- Advertisement -

कोड एम वेब सीरीजमुळे चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफर विंगेट आत्तापर्यंत हिंदी टेलिव्हिजनपासून ओटीटीपर्यंतचे अंतर पार केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जेनिफर विंगेटची कोड एम वेब सीरीज चर्चेत आहे. यामध्ये तिने मेजर मोनिका मेहराची भूमिका साकारली होती. गेल्या आठवडयात रिलीज झालेल्या या वेब सीरीजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

- Advertisement -

 


हेही वाचा :इमोशनल, कॉमेडी, भन्नाट डायलॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -