घरताज्या घडामोडीkareena Kapoor Corona Positive: 'मी ठिक आहे', कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाची पहिली...

kareena Kapoor Corona Positive: ‘मी ठिक आहे’, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट

Subscribe

करिना आणि अमृता अरोरा एका छोट्या डिनर पार्टीला गेले असता दोघी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत.

भारतात ओमिक्रॉनचा धोका वाढत असताना अभिनेत्री करिना कपूर कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. करिनाने स्वत:ला घरीच क्वारंटाइन केले आहे. मुंबई पालिकेने करिनाचे घर सील केले आहे. करिनासोबतच तिची खास मैत्रिण अमृता अरोरा हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बेबोने तिच्या सोशल मीडियावरुन तिला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी करत ती ठिक असल्याचे सांगितले आहे. करिनाने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘मला कोरोनाची लागण झाली आहे. मी घरीच क्वारंटाइन असून माझ्या सहवासात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्या. माझे कुटुंब आणि स्टाफने कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांच्यात सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. देवाच्या कृपेने मी ठिक आहे’.

- Advertisement -

 

करिना जबाबदार व्यक्ती आहे

करिनाच्या संबंधित व्यक्तिने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, करिनाने लॉकडाऊनच्या काळात स्वत:ची आणि कुटुंबाची फार चांगली काळजी घेतली. सिनेमाच्या जाहिरातीच्या शुटींग दरम्यानही ती सगळे नियम पाळायची. करिना आणि अमृता अरोरा एका छोट्या डिनर पार्टीला गेले असता दोघी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. डिनर पार्टीत करिनाच्या फार जवळचे मित्र मैत्रीणी उपस्थित होते. पार्टीमध्ये एक व्यक्ती खोकत होता त्या व्यक्तीने तब्येत ठीक नसताना पार्टीत सहभागी व्हायला नको होते.

- Advertisement -

करिना खूप जबाबदार व्यक्ती आहे. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वत:ला क्वारंटाइन केले. त्यामुळे तिला दोष देण्यात काही अर्थ नाही तिने कोरोनाचे प्रोटोकॉल्स पाळले आहेत. ती एक जबाबदार व्यक्ती असून ती तिच्या कुटुंबाची योग्य काळजी घेते.

पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

कभी खुशी कभी जम या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माता करण जोहरने छोटी डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला १५-२० जण उपस्थित होते. यात अभिनेत्री करिना कपूरसोबत तिची बहिण करिश्मा कपूर अमृता अरोराची बहिण मलायका अरोराही उपस्थित होती. पार्टीतील त्यांचे काही फोटो देखील समोर आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करिना आणि करिश्मा कपूर गाडीत मस्ती करताना दिसत आहेत. पापाराझींच्या कॅमेरापासून लपण्यासाठी करिना तोंड लपवत आहे.

कोरोना काळात करिनाने मुलाला जन्म दिला

करिना कपूर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या काळात पूर्णपणे घरी होती. याच काळात तीने जेह या तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर करिनाने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. त्यानंतर करिना अनेक पार्ट्यांना हजेरी लावताना दिसली.


हेही वाचा – kareena Kapoor Corona Positive: अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता आरोरा कोरोना पॉझिटिव्ह, करण जोहरच्या पार्टीला लावली होती हजेरी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -