घरमनोरंजन'केबीसी' कार्यक्रमाच्या विशेष भागात काजोलची हजेरी

‘केबीसी’ कार्यक्रमाच्या विशेष भागात काजोलची हजेरी

Subscribe

केबीसीच्या कार्यक्रमातील शुक्रवारच्या विशेष भागात अभिनेत्री काजोलची उपस्थिती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी सामाजिक कार्यात सहभाग असणारी रॉबिन हूड आर्मीचे संस्थापक कर्मवीर म्हणून सहभागी होणार आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रीय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आज यंदाच्या सीजनचे दुसरे कर्मवीर हजेरी लावणार आहेत. सोनी वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या केबीसीच्या १० व्या सीजनमध्ये गेल्या सीजनप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातील एका मान्यवाराला आमंत्रित केले जात आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या केबीसीच्या कार्यक्रमात दर शुक्रवारी एक पाहुणा सर्धक हजेरी लावतो. तर त्याच्यासोबत एक सेलिब्रिटी पाहुणा उपस्थित असतो. आज पार पडणाऱ्या कार्यक्रमात बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री काजोल उपस्थिती लावणार आहे. तर प्रमुख पाहुणा सदस्य हा रॉबिन हूड फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक नील घोष उपस्थित राहणार आहेत. काजोल त्यांना पाठिंबा देण्यासाठी केबीसीमध्ये येणार आहे.

काजोलने केले केबीसीचे कौतुक 

केबीसीबाबत आपल्या भावना व्यक्त करताना काजोल सांगते की, “कब तक रहोगे क्षण आणि कर्मवीर ही कल्पना अविश्वसनीय आहे. अशा गमतीशीर गोष्टींचा फायदा सामान्य माणसांना होत आहे. या निमित्ताने सर्वसामान्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळते. तसेच ते पैसही कमवू शकतात.” रॉबिन हूड आर्मीला सहकार्य करण्याबाबत काजोल सांगते, “मी निश्चितपणे या हॉट सीटवर नीलसोबत आहे आणि या विशिष्ट भागावर त्याला मदत करून त्याच्या बरोबरीने उभे राहून रॉबिन हूडआर्मी तसेच त्यांना जे काही करायचे आहे, त्यासाठी त्यांना मदत करणार आहे.”

- Advertisement -
kajol in kbc
नील घोष आणि काजोल हॉटसीटवर असताना

पहिल्या भागात आमटे दाम्पत्याची हजेरी 

गेल्या आठवड्यात डॉ. प्रकाश आणि डॉ. मंताकिनी आमटे या ज्येष्ठ समाजसेवक जोडीने केबीसीमध्ये उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक झाले असून कार्यक्रमाचे होस्ट महानायक अमिताभ बच्चन हे देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्वाने भारावून गेले होते. आमटे दाम्पत्यांनी आपल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या विकासासाठी या खेळातून २५ लाख रुपये जिंकले. या दोन व्यक्तीमत्त्वाच्या कर्तृत्वाचे भारावलेले बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रल्कपाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली. महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात स्वतःचे २५ लाख रुपये जमा केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -