घरमनोरंजनRRR वर krk ची संतप्त प्रतिक्रिया, म्हणतो S Rajamouli ला जेलमध्ये टाका

RRR वर krk ची संतप्त प्रतिक्रिया, म्हणतो S Rajamouli ला जेलमध्ये टाका

Subscribe

केआरकेच्या या ट्विटनंतर आता RRR च्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्स RRR बद्दल खोटा रिव्ह्यू देण्याबद्दल किती पैसे मिळाले असे विचारू लागले आहेत.

SS Rajamouli यांच्या ‘RRR’ चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. दोन दिवसात चित्रपटाने सुमारे 43 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. त्यामुळे ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा हा चित्रपट द काश्मीर फाईल्स चित्रपटाला आता टक्कर देताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक होत आहे. त्याच वेळी कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके याने या चित्रपटावर संताप व्यक्त केला आहे. KRK हा सर्वात वाईट चित्रपट असल्याचे म्हणत त्याने एसएस राजमौली यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला की, अशाप्रकारचा सर्वात वाईट चित्रपट आजतागायत संपूर्ण भारतात बनलेला नाही. तसेच सोशल मीडियावर देखील त्याने चित्रपटावर खूप टीका केली आहे.

KRK ने आपल्या ट्विटरवरून ट्विट करत म्हटले की, साऊथची मसाला फिल्म RRR हेडलेस आहे. स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेने म्हटले की, हा एक चुकीचा चित्रपट नाही तर एक गुन्हा आहे. मी याला चूक म्हणू शकत नाही पण मी याला सर्वात मोठा गुन्हा नक्कीच म्हणेन. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये RRR हा बकवास चित्रपट बनवल्याबद्दल दिग्दर्शक राजामौली यांना किमान 6 महिन्यांची तुरुंगवास व्हायला हवा.

- Advertisement -

तर दुसर्‍या एका ट्विटमध्ये त्याने या चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्यावर टीका करत त्यांच्या ‘आरआरआर’ची तुलना राम गोपाल वर्मा यांच्या ‘आग’ चित्रपटाशी केली. त्याने पुढे लिहिले की, ‘राजामौली सर तुम्ही माझ्या सर्व संवेदना मारत आहात. मी आज माझे सर्व ज्ञान गमावले आहे. कस जमत तुम्हाला हे? मजा आहे सर. सर्व डायरेक्टर स्वतःची आग करतात आणि RRR ही तुमची आग आहे.

- Advertisement -

त्याने पुढे लिहिले की, ‘आरआरआर हा चित्रपट सर्वात वाईट चित्रपट आहे, जो भारतीय चित्रपटांच्या इतिहासात यापूर्वी कधीही बनला नव्हता. या चित्रपटाने लोकांच्या डोक्याच्या शीरा फाटल्या आहेत. त्यांना जिवंत प्रेत बनवले आहे. हा चित्रपट भारतातील सर्वात वाईट चित्रपट आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान या मूर्खपणाच्या तुलनेत हा मुघल-ए-आझम आहे.’

केआरकेच्या या ट्विटनंतर आता RRR च्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही युजर्स RRR बद्दल खोटा रिव्ह्यू देण्याबद्दल किती पैसे मिळाले असे विचारू लागले आहेत.


साताऱ्याच्या केरप्पांची ८ किलो वजनाची नागीण चप्पल चर्चेत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -