Karishma Tanna Wedding : करिश्मा तन्ना अन् वरुण बंगेरा आज विवाहबंधनात अडकणार

नुकतंच अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपासून अभिनेत्री करिश्मा तन्नाच्याही लग्नाच्या चर्चांना उधाण आले. अखेर आज 5 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. करिश्माचा 3 फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला मेहंदी सोहळ्याचे फोटोही समोर आले होते.

Karishma Tanna Wedding: Karishma Tanna Anwar Varungera will get married today
Karishma Tanna Wedding : करिश्मा तन्ना अन् वरुण बंगेरा आज विवाह बंधनात अडकणार

नुकतंच अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपासून अभिनेत्री करिश्मा तन्नाच्याही लग्नाच्या चर्चांना उधाण आले. अखेर आज 5 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. करिश्माचा 3 फेब्रुवारीला हळदीचा कार्यक्रम होता आणि त्यानंतर 4 फेब्रुवारीला मेहंदी सोहळ्याचे फोटोही समोर आले होते. आज करिश्मा तन्ना बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत सात फेरे घेणार आहे. तिच्या लग्नाच्या तयारीचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर येत आहेत, ज्यामध्ये करिश्मा तिच्या लग्नातील सर्व फंक्शन्स एन्जॉय करताना दिसत आहे. दक्षिण भारतीय आणि गुजराती रितीरिवाजांनुसार हे दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna)


करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा खूप दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. प्रदीर्घ नात्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करिश्मा आणि वरुणची भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली आणि त्यानंतर दोघेही मित्र बनले. त्यानंतर बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी दुबईमध्ये एंगेजमेंट केली.

डेस्टिनेशन वेडिंग – प्री-वेडिंग फंक्शन पूर्ण झाल्यानंतर, करिश्मा 5 फेब्रुवारी 2022 रोजी तिचा प्रियकर वरुण बंगेरासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. एका वृत्तानुसार, करिश्मा तन्नाने डेस्टिनेशन वेडिंगहीचे प्लॅन केले आहे. दोघांनीही गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सात फेरे घेणार आहेत. हळदी मेहंदीच्या फोटोंमध्ये दोघेही खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. अलीकडे अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक लग्नगाठ बांधली आहे. करिश्मा तन्ना गर्ल गँगसोबत डान्स करताना दिसली तर वरुण तिची मेहंदी सुकवताना दिसला. असे अनेक क्षण तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

काही काळापूर्वी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. नुकतेच मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी बंगाली आणि मल्याळम रितीरिवाजानुसार लग्न केले होते.


हे ही वाचा – Happy Birthday Abhishek Bachhan : लहानपणी ‘या’ आजराशी झुंज देत होता अभिषेक बच्चन