काश्मिरी पंडिताच्या मृत्यूवर अनुपम खेर यांनी व्यक्त केला तीव्र संताप

या घटनेचा निषेध करत अनुपम खेर यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, आजच्या घडीला देखील काश्मिरी पंडितांवर अत्याचार केला जात आहे ही एक निंदनीय बाब आहे.

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर वारंवार आपल्या विविध विषयांवरील प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे मांडत असतात. अनुपम खेर यांना त्यांच्या परखड आणि मोकळेपणाने बोलण्याच्या अंदाजामुळे देखील ओळखले जाते. याचं दरम्यान, जम्मू काश्मिर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, या राज्यामध्ये आतंकवाद्यांनी तेथील सामान्य नागरिकांवर गोळीबार केला, ज्या गोळीबारामध्ये एका काश्मिरी पंडिताची हत्या झालेली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत अनुपम खेर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेचा निषेध करत अनुपम खेर यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, आजच्या घडीला देखील काश्मिरी पंडितांवर अत्याचार केला जात आहे ही एक निंदनीय बाब आहे. ते भारतासोबत उभे असणाऱ्या प्रत्येकाला मारत आहेत. हे गेल्या ३० वर्षांपासून चालू आहे. तुम्ही या गोष्टीचा जितका विरोध कराल, तितका हा कमी असेल, आपल्याला ही मानसिकता बदलायला हवं.

दरम्यान, जम्मू काश्मिरमध्ये नुकत्याच दकाही दिवसांपूर्वी अशांती आणि दहशत पसरवण्यासाठी आतंकवाद्यांनी पुन्हा एकदा सामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एकाने आपला जीव गमावला तर एकजण जखमी झाला आहे.

‘द काश्मिर फाईल्स’मध्ये दिसले होते अनुपम खेर
अनुपम खेर याआधी ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटामध्ये दिसले होते. या चित्रपट काश्मीरी पंडितांच्या संघर्षावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. अनुपम खेर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, मृणाल जोशी, पल्लवी जोशी हे सुद्धा होते.

 


हेही वाचा :9 सप्टेंबरला काय होईल हे माहीत नाही…करण जोहरला वाटतेय ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची काळजी