घरमनोरंजनकतरिनाच्या 'फोन भूत'ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमावले केवळ इतके कोटी

कतरिनाच्या ‘फोन भूत’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमावले केवळ इतके कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कतरिनाने नव्या प्रकारची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या स्टार कास्टपासून चित्रपटाची कथा देखील मजबूत आहे. मात्र, तरीही या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 2.05 कोटींची कमाई केली होती. दरम्यान, आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीची कमाई देखील समोर आली आहे. कतरिनाच्या फोन भूतने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 3 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अधिक कमाई केलेली दिसून येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास 80-90 कोटींचा खर्च करण्यात आला होता. मात्र, याचं काळात बॉलिवूडमध्ये आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे हा चित्रपट किती कमाई करेल सांगता येत नाही.

‘फोन भूत’मध्ये आहेत ‘हे’ कलाकार

- Advertisement -

गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोन भूत’ हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे. तसेच कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत जॅकी श्रॉफ सुद्धा या चित्रपटात आहे.

कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट

कतरिनाचा 4 नोव्हेंबर रोजी ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कतरिना सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच आलिया भट्ट आणि प्रियांका सोबत कतरीना ‘जी ले जरा’मध्ये देखील दिसणार आहे.

 


हेही वाचा :

‘या’ दोन चित्रपटांमुळे कतरिनाच्या ‘फोन भूत’चे वाजले बारा; पहिल्या दिवशी कमावले अवघे इतके कोटी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -