घरमनोरंजनकेतकी चितळे ट्रोलिंग प्रकरणात एकाला अटक

केतकी चितळे ट्रोलिंग प्रकरणात एकाला अटक

Subscribe

गोरेगाव पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील एकाला अटक केली असून सतीश पाटील असे या तरुणाचे नाव आहे

गेले काही दिवस अभिनेत्री केतकी चितळेला सोशलमिडीयावर ट्रोल केले जात होते. केवळ हिंदी भाषेत बोलण्यामुळे केतकीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. याबाबत केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अभिनेत्री केतकी चितळे हिला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोध सुरू होता. यावेळी गोरेगाव पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील एकाला अटक केली असून सतीश पाटील असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या तरूणाला औरंगाबाद येथून पकडले.

हजारांहून अनेकांनी तिला केले ट्रोल 

अश्लील आणि शिवराळ भाषेत ट्रोल करणाऱ्यांना केतकीने व्हिडीओ अपलोड करून जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. ‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेतून सगळ्यांनसमोर आलेली केतकी चितळेने सोशल मीडियावर हिंदी भाषेत एक व्हिडीओ अपलोड केला होता. एक मराठी अभिनेत्री असून हिंदीमध्ये व्हिडीओ अपलोड करणाऱ्या केतकीवर अनेकांनी टिका केली होती. साधारण हजारांहून अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

- Advertisement -

फडणवीसांच्या आदेशानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यामध्ये काहींनी अश्लील, शिवराळ आणि खालच्या स्तरातील भाषा वापरल्याने संतापलेल्या केतकीने ट्रोलकऱ्यांना त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले, असे असताना ही केतकीला ट्रोल केले जात असल्याने केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ट्रोल करणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्याची मागणी तिने मुख्यमंत्र्यांकडे केली. फडणवीस यांच्या आदेशानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेकडो ट्रोलकरांमधील एकजण औरंगाबादमधून अटक

गोरेगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून केतकीला ट्रोल करणाऱ्यांचा तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यावरून शेकडो ट्रोलकरांमधील एकजण औरंगाबाद येथील असल्याचे समजल्यावर औरंगाबाद येथे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सतीश पाटील याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -