घरमनोरंजनपॉप स्टार रिहाना ठरली श्रीमंत सिंगर,वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

पॉप स्टार रिहाना ठरली श्रीमंत सिंगर,वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

Subscribe

अमेरिकेन पॉपस्टार रिहाना आपल्या गाण्यांसाठी आणि फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. 33 वर्षाची रिहाना आता जगातील सर्वात श्रीमंत महिला म्यूझिशियन ठरली आहे. फोर्ब्स मॅगजीनने हि माहिती दिली असून बुधवारी याची घोषणा करण्यात आली आहे. रिहानाची वार्षिक कमाई 1.7 बिलियन डॉलर इतकी आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनूसार रिहानाचं प्रमुख इंन्कम सोर्स म्यूझिक नसून रिहानाने ही कामाई फेंटी ब्यूटी कॉस्मेटिक्स लाईनच्या 50 टक्के भागीदारीतून 1.4 बिलियान डॉलर कमाई केली आहे. तसेच रिहानाच्या मिळकतीचा उरलेला भाग हा Savage x Fenty Lingerie comapy मधून येतो. या व्यतीरिक्त रिहाना तिच्या म्यूझिक टॅलेन्टमधून सर्व कामाई करत असल्याचे फोर्ब्सने म्हंटले आहे.रिहानाचे खरं नाव रॉबिन फेंटी आहे. 2017 मध्ये तिने लग्जरी गुड्स कंपनी LVMH सोबत भागिदारीने फेंटी ब्यूटी कंपनी लॉन्च केली होती. या कंपनी अंतर्गत डार्क टू व्हाइट स्किन टोन शेट्स ब्यूटी प्रोटक्ट तयार करण्यात येतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Forbes (@forbes)

- Advertisement -

फोर्ब्सच्या यादित रिहाना सर्वात श्रीमंत एंटरटेनर महिलेच्या यादित दुसऱ्या स्थानी आहे. रिहानाचं प्रत्येक गाणं इंटरनेटवर व्हायरल होतं तसेच चार्टबस्टर लिस्टमध्ये सर्वात टॉपर असतात.0रिहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचा भला मोठा चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी रिहानाची भारतात सर्वाधिक चर्चा होत होती. कारण रिहानाने दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात ट्विट केल्यानंतर अनेकांनी तिला धारेवर धरलं तर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी तिला पाठिंबा दिला होता. सध्या रिहाना प्रसिद्धी झोतात असून फोर्ब्सच्या यादित आल्यानंतर रिहानाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण  झाले आहे.


हे हि वाचा – HBD:काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण,आज आहे सुपरस्टार

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -