घरमनोरंजन'या' अभिनेत्याचा आहे वाढदिवस, बायकोने दिले खास गिफ्ट!

‘या’ अभिनेत्याचा आहे वाढदिवस, बायकोने दिले खास गिफ्ट!

Subscribe

अभिनेता रितेश देशमुखचे चाहते केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतही आहेत. आज रितेशचा वाढदिवस. रितेश आपला ४१ वाढदिवस साजरा करत आहे. २००३ पासून रितेशने आपल्या करियरला सुरूवात केली. संपूर्ण देशमुख कुटूंब राजकारणात असलं तरी रितेश मात्र राजकारणापासून दूरच आहे. तुझे मेरी कसम या चित्रपटातून रितेशची बॉलिवूड करियरला सुरूवात झाली.

- Advertisement -

 

रितेश देशमुखने मुंबईतील रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून शिक्षण घेतलं. यानंतर त्याने परदेशातील एका कंपनीत एक वर्ष आर्किटेक्ट म्हणून कामही केलं. यादरम्यानच्या काळात त्याने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं आणि तो मुंबईत परतला. सध्या सिनेमात जरी रितेशचं बस्तान बसलं असलं तरी ‘इवॉल्यूशन्स’ ही आर्किटेक्चरल अँड इंटीरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. याशिवाय त्याची स्वतःची प्रोडक्शन कंपनीही आहे.

View this post on Instagram

Happy Fathers Day Baba… I Love You

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

- Advertisement -

आणि रितेशने जेनेलियाशी लग्न केलं

रितेशची ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया डिसुझाशी ओळख झाली. त्यावेळी रितेशचे वडिल विलासराव देशमुख मुख्यमंत्री होती.तसंच मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळे त्यात माज असेल असा विचार करून जेनेलियाने त्याला भाव दिला नाही. मात्र काही काळानंतर जेनेलीयाला रितेश कसा आहे हे समजलं.

View this post on Instagram

#RahylRiteishDeshmukh

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

त्यांच्यात मैत्री फुली लागली. तब्बल १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेनेलिया ख्रिश्चन आणि रितेश हिंदू असल्याने दोघांच्या लग्नाची चर्चाही खूप झाली होती. या दोघांना रिआन आणि राहिल अशी दोन मुलं आहेत. २०१४ मध्ये रितेश देशमुख पहिल्यांदा बाबा झाला. त्यानंतर २०१६ मध्ये त्याच्या घरी दुसरा पाहूणा जन्माला आला.

रितेशचे हे चित्रपट ठरले खास

आतापर्यंत रितशने अनेक मल्टिस्टार चित्रपटात काम केलं आहे. मस्ती,ग्रँड मस्ती,ग्रेट ग्रँड मस्ती, हाऊसफुल २,’क्या सुपर कूल हैं हम’, ‘डबल धमाल’, ‘जाने कहां से आई है’, ‘अलादीन’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘एक विलेन’ आणि ‘मरजावां’ यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -