घरमनोरंजनकेआरकेने आता विद्या बालनशी घेतला पंगा

केआरकेने आता विद्या बालनशी घेतला पंगा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत असतो. यात गेल्या काही दिवसांपूर्वी केआरकेने बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि नंतर अक्षय कुमारवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यात केआरकेने आता अभिनेत्री विद्या बालनला टार्गेट केले आहे. विद्या बालनचा शेरनी या चित्रपच नुकताच रिलीज झाला. यावेळी त्याने विद्या बालनचया या चित्रपटावरून रिव्ह्यू न देता चित्रपटावर टीका केली आहे. विद्या बालनचा हा छोटा चित्रपट असून त्यावर रिव्ह्यू देणार नाही असे वक्तव्य केआरकेने केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर युजर्स आता केआरकेला ट्रोल करत आहेत.

- Advertisement -

केआरकेने ट्वीट करत म्हटले की, बरेच लोक मला म्हणाले की शेरनी या चित्रपटाचा रिव्ह्यू करा, पण मी छोटे चित्रपट पाहत नाही आणि त्याच्यावर रिव्ह्यू करतं नाही किंवा अशा चित्रपटांवर चर्चाही करत नाही. कारण मी द ब्रँड केआरके जगातील नंबर १चा चित्रपट समीक्षक आहे, असे ट्वीट केआरकेने केले आहे. दरम्यान सलमान खान आणि त्याच्या बिंग ह्युमन संस्थेवर केलेल्या आरोपामुळे केआरके अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -


‘बुगी वुगी’ शोमधून ५ लाख जिंकून फेडले कर्ज,’ स्ट्रगलचे दिवस आठवून धर्मेश झाला भावूक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -