Lata Mangeshkar Health Update: लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, प्रार्थनेचे डॉक्टरांकडून आवाहन

लता दींदीच्या वयामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्या प्रकृतीचे वेळोवेळी मॉनिटरींग केले जात असून लता दीदींच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Lata Mangeshkar Health Update she still in icu appeal to pray for her recovery
Lata Mangeshkar Health Update: लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, प्रार्थनेचे डॉक्टरांकडून आवाहन

गानसम्राज्ञी लता  मंगेशकर (Lata Mangeshkar)  गेल्या 12 दिवसांपासून रुग्णालयात आहेत. कोरोना पॉझिटीव्ह (corona Positive)  आणि न्युमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)  दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. लता दींदीच्या वयामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्या प्रकृतीचे वेळोवेळी मॉनिटरींग केले जात असून लता दीदींच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून सर्वांनी प्रार्थना करा असे आवाहन ब्रीच कँडी रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींवर अजूनही IUCमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करत असून त्या बरे होण्यासाठी प्रार्थना करा, असे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉ. प्रतित समदानी यांनी म्हटले आहे.

92 वर्षांच्या लता मंगेशकर यांनी कोरोनासह निमोनिया देखील झाल्याने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहेत. 8 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी म्हटले होते की, डॉक्टरांच्या देखरेखीखाली लता दीदींना 10-12 दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल. मुंबईतील सर्वात चांगले डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता दीदींच्या प्रकृतीसाठी त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचे करोडो फॅन्स देखील प्रार्थना करत आहेत.

लता मंगेशकर यांच्या सुमधूर आवाजाची प्रत्येक पिढी साक्षीदार आहे. तब्बल 7 दशके त्यांनी त्यांच्या मखमली आवाजाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. लता दीदींच्या सुपर हिट गाण्यांची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. प्रत्येक पिढीसोबत काम करुन त्यांनी लोकांना लोकांना प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन त्या घरी जाव्यात यासाठी लाखो करोडो लोक प्रार्थना करत आहेत.


हेही वाचा –  Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल