घरताज्या घडामोडीGoa Assembly Election 2022 : गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट, त्रिशंकू...

Goa Assembly Election 2022 : गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट, त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल : संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्र लगतच्या मतदार संघातून शिवसेनेच्या मतदारांना लढवण्याची आमची तयारी झालेली आहे. मुंबईतून आमचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. ते सुद्धा काम करत आहेत. गोव्यातील कार्यकर्ते मिळून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. तसेच गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट असून त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र लगतच्या मतदार संघातून शिवसेनेच्या मतदारांना लढवण्याची आमची तयारी झालेली आहे. मुंबईतून आमचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. ते सुद्धा काम करत आहेत. गोव्यातील कार्यकर्ते मिळून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यादी पाठवली जाणार त्यानंतर यादी जाहीर केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उमेदवारांची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर करू शकते. परंतु आमच्या दोन्ही पक्षांमध्ये मतदार संघाबाबत कोणतेही प्रश्न किंवा वाद नाहीयेत.

- Advertisement -

गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट

गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाने गोव्यामध्ये प्रयोगशाळा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात आले आहेत. तसेच त्यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रमुखही येथे बसलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तंबू येथे पडलेला आहे. काँग्रेस आणि शिवसेना सुद्दा येथे आहेत. त्यामुळे लढू आणि जिंकू, असं संजय राऊत म्हणाले.

गोव्याची परिस्थिती ही त्रिशंकू विधानसभेकडे चालली आहे. अशावेळी आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू. त्यामुळे आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर आमचं सरकारमध्ये स्थान असेल.

- Advertisement -

पर्रीकरांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहे

पणजीमधून उत्पल पर्रीकर यांचं नाव दिसत नसून बाबूश मॉन्सेरा आणि त्यांच्या पत्नीचं नाव घेण्यात येत आहे. असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला असता ते म्हणाले की, ज्याप्रमाणे महाराष्ट्रात माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे त्याचप्रमाणे येथे बाबू मॉन्सेरा भाजपची जबाबदारी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत घोषणा दिसत आहेत. परंतु तो पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. आमची फक्त पर्रीकरांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहेत. उत्पल पर्रीकर यांच्याविषयी ज्या सद्भभावना आहेत त्या व्यक्त केल्या. त्यामुळे भाजपच्या यादीशी आणि उमदेवारांशी काहीही संबंध नाहीये, असं संजय राऊत म्हणाले.

नटसम्राट हे महाराष्ट्राचं फार मोठं वैभव

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नटसम्राट असं म्हटलं होतं. त्यालाच प्रत्यूत्तर करत संजय राऊत म्हणाले की, नटसम्राट हे महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे. या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातील हे सर्व नटसम्राट गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत कला नाट्य ही गोव्याची भूमी आहे. नटसम्राटची खिल्ली उडवून गोव्याच्या जनतेचा आणि रसिकजनांचा ते अपमान करतायत. गोव्याने रंगूभूमी ही संपन्न केली आहे. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. परंतु आम्ही सोंगाडे नक्कीच नाही आहोत.


हेही वाचा : Covid hits India U-19 team : टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -