Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा Covid hits India U-19 team : टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव,...

Covid hits India U-19 team : टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट घोंघावत असून आता पुन्हा एकदा कोविड-१९ ने टीम इंडियामध्ये शिरकाव केला आहे. अंडर-१९ वर्ल्डकप सुरू असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. अंडर-१९ च्या टीम इंडियातून सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. टीमचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद आणि इतर चार खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. टीम इंडियाचा काल (बुधवार) आयर्लंडसोबत सामना होणार होता. परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच संघावर कोरोनाचं वादळ आलं.

टीम इंडियातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतरही आयर्लंडसोबतच सामना रद्द करण्यात आलेला नव्हता. यावेळी निशांतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा सामना खेळला. कारण क्रिकेट विश्वचषकातील सामन्यासाठी १७ सदस्यांचा संघ नेण्यात आला होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या धक्क्यानंतरही हा सामना सुरू ठेवला होता.

- Advertisement -

सहा खेळाडूंची सध्याची स्थिती काय?

सिद्धार्थ जाधव – आरटी-पीसीआर टेस्ट अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

मानव पारख – कोविड-१९ ची लक्षण पारखमध्ये आढळून आली. रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल नकारात्मक आला आहे.

वासु वत्स – वस्तचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल नकारात्मक आला आहे.

यश ढुल – रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल सकारात्मक आला आहे.

आराध्य यादव – रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल सकारात्मक आला आहे.

एसके रशीद – रॅपिड अँटीजन टेस्टचा अहवाल सकारात्मक आला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच हे सर्व खेळाडू कोचिंग यूनिटच्या संपर्कात आहेत. त्यांना विलगीकरण कक्षेत ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बीसीसीआयची मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, टीम इंडियाने आपल्या मिशनची सुरूवात विजयापासून केली होती. या ग्रूपमध्ये सर्वात टॉपवर आहे. २२ जानेवारी रोजी टीम इंडिया युगांडाविरूद्धच्या संघासोबत खेळणार आहे.


हेही वाचा : Britain Covid19 : ब्रिटनमध्ये मास्क मुक्ती ! वर्क फ्रॉम होमबाबत PM बोरिस जॉन्सन यांची मोठी घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -