घरCORONA UPDATELockdownEffects- अभिनेत्रीच्या मुलाने दारू मिळाली नाही म्हणून घेतल्या झोपेच्या गोळ्या!

LockdownEffects- अभिनेत्रीच्या मुलाने दारू मिळाली नाही म्हणून घेतल्या झोपेच्या गोळ्या!

Subscribe

भूपतीने झोपेच्या गोळ्यांचा ओवरडोस घेतल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या वाढत्या फैलावावर नियंत्रण मिळवणे काही अंशी शक्य झाले आहे. पण या लॉकडाऊनमुळे देशात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बाकी सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे.  त्यामुळे अर्थात दारूची दुकानेही बंद आहेत.  अशावेळी दारू न मिळाल्यामुळे लोकं काय करतील याचा नेम नाही. गेले काही दिवस अनेक वेगवेगळ्या बातमी आल्या आहेत. त्यात धक्कादायक बातमी म्हणजे, दिवंगत दाक्षिणात्य अभिनेत्री मनोरमा यांचा मुलगा भूपतीने दारु न मिळाल्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत.

भूपतीने झोपेच्या गोळ्यांचा ओवरडोस घेतल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मनोरमा यांचा मुलगा भूपतीला दारुचे व्यसन आहे. पण सध्या देशात लॉकडाऊनमुळे दारूची दुकानं आणि बार बंद आहेत. त्यामुळे भुपतीने दारू न मिळाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. या गोळ्यांचा ओवरडोस झाल्यामुळे त्याला ७ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि मनोरमाच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

- Advertisement -

मनोरमा या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी १५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ५०० हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे अनेक मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या.


हे ही वाचा – ‘या’ अभिनेत्याचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह, इन्स्टाग्रामवर केला खुलासा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -