घरमनोरंजनLEO सिनेमाची पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड कमाई 100 कोटींच्या पार

LEO सिनेमाची पहिल्याच दिवशी वर्ल्डवाइड कमाई 100 कोटींच्या पार

Subscribe

साउथ सुपरस्टार थलापति विजय याचा बहुप्रतिक्षित सिनेमा 19 ऑक्टोंबरला सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘लियो’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी तगडी कमाई करत एक मोठा रेकॉर्ड सेट केला आहे. थलापति विजयचा हा सिनेमा बक्कळ कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार थलापति विजयच्या लियोने वर्ल्डवाइड 100 कोटींपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे.

सैकनिक्लच्या रिपोर्ट्सनुसार, लियो सिनेमाने देशातील बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये 63 कोटींचा बिझनेस केला आहे. असे म्हटले जात होते की, या सिनेमाचे आपल्या येथे कलेक्शन 74 कोटींच्या आसपास असायचे. रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयच्या सिनेमाने वर्ल्डवाइड 130-140 कोटींच्या आसपास बिझनेस केला होता.

- Advertisement -

LEO Movie Review - Vijay is savior for this bland second half thriller... -  Cinereporters English

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थलापति विजयच्या या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक करत शाहरुख खानच्या पठान सिनेमाला मागे टाकले आहे. तर पठान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 57 कोटींची कमाई केली होती. मात्र लियोने 63 कोटींचा बिझनेस करत शाहरुखच्या पठानला मागे टाकले आहे.

- Advertisement -

शाहरुखच नव्हे तर थलापति विजयने रजनीकांत सिनेमाचा ‘जेलर’ला मागे टाकले होते. रिपोर्ट्सनुसार, जेलरला मागे टाकला. रिपोर्ट्सनुसार जेलरने पहिल्याच दिवशी 44 कोटींचे कलेक्शन केले होते. थलापति विजयचा लियो सिनेमा पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. त्यात तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदीचा समावेश आहे.


हेही वाचा- ‘सिंघम 3’मध्ये झाली टायगर श्रॉफची एन्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -