Video – सुबोध भावेचा पोलिसांना एकदम कडककक… सलाम!

मराठी कलाकारांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांनी तर ‘दिल से थँक्यू’ हा नवा ट्रेंडही सुरू झाला आहे.

Subodh Bhave

देशावर कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे या बंदच्या काळात कोणताही नागरिक अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. पण तरी देखील काहीजण अद्याप उगाचच रस्त्यावर फिरताना दिसतात.  त्यामुळे या बंदच्या काळात कोणताही नागरिक अनावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये यासाठी पोलिस मात्र दिवस रात्र गस्त घालत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.

सुबोधने घाणेकर स्टाईलमध्ये हा व्हीडिओ तयार केला आहे. यात काशीनाथ घाणेकरांच्या गाजलेल्या वाक्यांचा वापर केला आहे.

 काय आहे व्हीडिओमध्ये

“काही दिवस तुम्हा-आम्हाला घरात बसावं लागलं तर काय झालं. उसमें क्या हैं?  घाबरुन जायचं नाही आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे  आणि दिवस-रात्र हे पोलीस बांधव-भगिनी रस्त्यावर थांबून आपल्या सर्वांचं रक्षण करतायेत. त्यांच्या या कार्याला माझा एकदम कडक सलाम”, असा व्हिडीओ सुबोधने ट्विटरवर शेअर केला आहे.

मराठी कलाकारांप्रमाणेच बॉलिवूड कलाकारांनी तर ‘दिल से थँक्यू’ हा नवा ट्रेंडही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.