अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटातील लूक झाला लीक; लंडनमध्ये सुरू आहे शूटिंग

या चित्रपटाचे शूटिंग सध्या यूकेमध्ये चालू असून हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट माइनिंग इंजीनिअर जसवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित आहे

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना एक नवीन सरप्राइज दिलेलं आहे. अक्षयने नुकताच त्याच्या एका नव्या चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. याचं शूटिंग सध्या यूकेमध्ये चालू असून हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट माइनिंग इंजीनिअर जसवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

अक्षय कुमारचा लूक होतोय व्हायरल

ही गोष्ट १९८९ मधील आहे. जसवंत सिंह गिल रानीगंज कोलफील्ड्समध्ये अडकले होते. तेव्हा त्यांनी ६४ लोकांचा जीव वाचवला होता. या चित्रपटात अक्षय कुमार जसवंत सिंह गिल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, निर्मात्यांकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा चित्रपट इंडियन फिल्म कंपनी पूजा एंटरटेनमेंट प्रोड्यूस करणार आहे. टीनू सुरेश देसाई या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

मात्र या चित्रपटाचं अजूनही नाव समोर आलेलं नाही. तसेच हा व्हायरल फोटो देखील शूटिंग दरम्यान एका चाहत्याने काढलेला आहे. सध्या याचं शूटिंग यूकेमध्ये ऑगस्टपर्यंत चालू असणार आहे.

दरम्यान, येत्या काळात अक्षयचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षयसोबत या चित्रपटात भूमि पेडणेकर सुद्धा दिसून येणार आहे.

 


हेही वाचा :ऋतिक रोशन आणि सबा आजाद फ्रांसमध्ये एकत्र