घरताज्या घडामोडीMadhuri Dixit Parenting Tips : मुलाला कॉलेजमध्ये पाठवताना 'धकधक गर्ल' ची धकधक...

Madhuri Dixit Parenting Tips : मुलाला कॉलेजमध्ये पाठवताना ‘धकधक गर्ल’ ची धकधक वाढली

Subscribe

प्रत्येक आईला आपल्या पाल्याची नेहमीच काळजी वाटत असते.जेव्हा शिक्षणासाठी कींवा रोजगारासाठी आपलं मुलं बाहेरगावी जाऊन कुटूंबापासून दूर राहत असेल तर, साहजिकच प्रत्येक आईची काळजी वाढते. अशीच काहीशी व्यथा बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरीचीसुद्धा आहे.  तिचा मुलगा अरिनचे कॉलेज लाइफ सुरू झाले तेव्हा तिच्या मनाची होत असलेली घालमेल, याबाबत माधुरीने काळजी व्यक्त केली आहे. तिचा मुलगा मोठा झाल्यावर तिला कसे वाटले आणि त्याला परदेशात अभ्यासासाठी पाठवल्यानंतर आणि स्वतःपासून दूर राहिल्यानंतर माधुरीला एक आई म्हणून नक्की काय वाटले,याचा व्हिडिओ माधुरीने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

 

माधुरीने सांगितले की, भारतात मुलांना खूप सुरक्षित ठेवले जाते. येथे मुले त्यांच्या पालकांसोबत राहतात आणि मुलांना जेवणापासून-कपड्यांपर्यंत सर्व काही पालक आयते देत असतात. पण आता त्यांच्या मुलाला हे सर्व स्वतःला करावे लागणार आहे आणि याचाच त्यांना त्रास होत आहे.माधुरी आपल्या मुलाच्या जाण्याने अस्वस्थ असताना, तिचे पती डॉ. नेने यांनी अरिनला परदेशात एकटे राहताना स्वतःची काळजी कशी घ्यावी याच्या काही टिप्स दिल्या आहेत.

- Advertisement -

माधुरीच्या पतीने दिले ‘आदर्श पालका’चे टिप्स

माधुरीचे पती डॉ. नेने यांनी त्यांचा मुलगा अरिन याला एकट्याने परदेशात शिकण्यासाठी काही टिप्स दिल्या. डॉक्टर नेने यांनी मुलाला दाढी करणे, कपडे नीट ठेवणे, वर्गात वेळेवर पोहोचणे, स्वच्छता, पैशाचे व्यवस्थापन, फिटनेस आणि खाण्याच्या सवयी आणि आजारी पडल्यावर काय करावे यासारखी काही मूलभूत कौशल्ये शिकवली.

माधुरी आणि डॉ. राम नेने यांच्याप्रमाणे लाखो पालकांना त्यांच्या मुलांपासून दूर राहावे लागते. अशा स्थितीत मुलांचे टेन्शन साहजिकच आहे. जर तुमचा मुलगा घरापासून दूर शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी जात असेल, तर तुम्ही त्याला डॉ. नेने यांच्याप्रमाणे काही मूलभूत जीवन कौशल्ये देखील शिकवू शकता. यामध्ये तुम्ही त्याला स्वयंपाक कसा करायचा, कपडे कसे धुवायचे, अशा मुलभूत गरजा शिकवू शकता.


 हे ही वाचा – Sidharth Shuklaच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा हसताना दिसली शेहनाज गिल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -