घरमनोरंजनमाधुरीचा घायाळ करणारा 'कलंक' लूक

माधुरीचा घायाळ करणारा ‘कलंक’ लूक

Subscribe

करण जोहरने कलंक या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. त्यात चित्रपटात असणारी तगडी स्टार कास्ट बघता प्रेक्षक चित्रपटाची अतुरतेने वाट पहात आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता दोन दिवस आधीच म्हणजे १७ एप्रिलला महाविर जयंतीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटातील कलाकारांचे लूक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत नक्कीच उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटाचा काळ ४० च्या दशकातील असून सगळ्याच व्यक्तिरेखा एका वेगळ्या रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. करण जोहरने ६ मार्चला ‘कलंक’चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. हा लूक पाहून या सिनेमाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

- Advertisement -

माधूरीच्या लूकला खास मुहूर्त

- Advertisement -

कलंक या चित्रपटात माधूरी दिक्षीतही मुख्य भुमिकेत दिसणार आहे. माधूरीचा लूक रिव्हील करण्यासाठी करण जोहरने खास मुहूर्त साधला होता. महिला दिना दिवशी करणने माधूरीचा लूक रिव्हील केला.

लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये माधूरीचा पहिला लूक समोर आला आहे. या लाल घागऱ्यात माधूरी खूपच सुंदर दिसत आहे.त्याचप्रमाणे तीची ज्वेलरी ही लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटात तगडी स्टार कास्ट

या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत, आलिया भट आणि वरूण धवन यांच्याबरोबर आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत.

 

का बदलली चित्रपटाची तारीख

कलंक चित्रपट १९ एप्रिलला नाही तर १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती आहे त्यामुळे अनेकांना सुट्टी असते. तर १९ एप्रिलाल गुड फ्रायडेची सुट्टी आहे. एकाच आठवड्यात या दोन सुट्ट्या आल्याने चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम होईल या विचाराने चित्रपटाची तारीख बदलण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -